SC Online Hearing: ऑनलाइन सुनावणी सुरू ठेवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात, सामान्य कामकाज पुन्हा सुरू करणे गरजेचे

डिजिटल माध्यमातून (Online hearing) न्यायालयांमध्ये करणे हा याचिकाकर्त्याचा मूलभूत अधिकार (Fundamental Rights) घोषित करण्यात यावा, अशी याचिका करण्यात आली होती. मात्र, न्यायालयानी याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आणि म्हटले आहे की, न्यायालयांमध्ये डिजिटल माध्यमातून सुनावणी सुरू ठेवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

SC Online Hearing: ऑनलाइन सुनावणी सुरू ठेवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात, सामान्य कामकाज पुन्हा सुरू करणे गरजेचे
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या तीन याचिकांवर आज सुनावणी
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 5:23 PM

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सोमवारी डिजिटल माध्यमातून (Online hearing) न्यायालयांमध्ये करणे हा याचिकाकर्त्याचा मूलभूत अधिकार (Fundamental Rights) घोषित करण्यात यावा, अशी याचिका करण्यात आली होती. मात्र, न्यायालयानी याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आणि म्हटले आहे की, न्यायालयांमध्ये डिजिटल माध्यमातून सुनावणी सुरू ठेवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. (SC rejects plea of online hearing as fundamental right says there are many hurdles all offline hearing should start)

दररोज 60-65 केसेसची सुनावणी होते

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बी.आर गवई यांच्या खंडपीठाने सांगितले की, डिजिटल माध्यमातून सुनावणी करताना अनेक अडचणी येत आहेत. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये ठेवली आहे. खंडपीठाने म्हटले की, “डिजिटल माध्यमातून सुनावणी करणे अडचणीचे ठरू शकते. वर्षभरापासून असे काम करूनही आम्ही दररोज 30-35 केसेसच्या तुलनेत 60-65 केसेसची सुनावणी करत आहोत.

न्यायालयाने म्हटले, “जर्नेल सिंग (पदोन्नती आरक्षण) केसमध्ये ज्येष्ठ वकील थेट हजर झाले होते, जेथे वकिलांनी सांगितले की येथे येऊन युक्तिवाद करणे चांगले आहे. आम्हीही आता कोर्ट सुरू करत आहोत. ते पूर्णपणे सुरू झल्यानंतर आम्ही सुनावणी करू.” ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी ही याचिका दाखल करून या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली होती. “डिजिटल माध्यमातून याचिकाकर्ता कुठेही बसून सुनावणी पाहू शकतो, उपस्थित राहू शकतो,” ते म्हणाले.

सामान्य कामकाज पुन्हा सुरू करणे गरजेचे

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, 70 वर्षांपासून तक्रारीशिवाय न्याय मिळत आहे, परंतु आज प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे. न्यायालयाने सुनावणीचे सामान्य कामकाज पुन्हा सुरू केले पाहिजे. न्यायालय ‘नॅशनल फेडरेशन ऑफ सोसायटीज फॉर फास्ट जस्टिस’ आणि काही एनजीओंच्या याचिकेवर सुनावणी करत होते, ज्यामध्ये याचिकाकर्त्यांचा मूलभूत अधिकार म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घोषित करण्याची विनंती करण्यात आली होती.

Other News

Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो

Padma Awards: कंगना, अदनान सामींसह 102 मान्यवरांचा पद्मश्रीने गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

LK Advani Birthday : ‘हॅप्पी बर्थडे अडवाणीजी’, मोदी, शहा, राजनाथ, जेपी नड्डांकडून शुभेच्छांचा वर्षाव

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....