पाकिस्तानने आजही मनमोहन सिंग यांच्या या वस्तू सांभाळल्या, इमारतीलाही दिले नाव
मनमोहन सिंग 2004 मध्ये भारताचे पहिली गैर हिंदू पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांचे गाव चर्चेत आले. पंजाब सरकारने 2007 मध्ये गाह गावाला आदर्श गाव बनवण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्या शाळेत मनमोहन सिंग यांचे शिक्षण झाले त्या शाळेला गव्हर्नमेंट बॉयज प्रायमरी स्कूल नाव दिले.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. 26 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेल्या मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी वयाच्या 92 वर्षी निधन झाले. डॉ.मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता. फळणीनंतर ते भारतात आले. पंजाबमधील अमृतसर त्यांचे कुटुंब राहू लागले.
पाकिस्तानमध्ये कुठे राहात होते मनमोहन सिंग?
मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यात झाला. त्यांचे गाव गाह आहे. या गावातील प्राथमिक शाळेत 1937 ते 1941 दरम्यान मनमोहन सिंग यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. फळणीनंतर हा भाग पाकिस्तानात केला. त्यानंतर त्यांचा परिवार भारतात आला. या सरकारी शाळेला पाकिस्तान सरकारने मनमोहन सिंग यांचे नाव दिले. या शाळेत डॉ.मनमोहन सिंग यांचे शाळेची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिकाही सांभाळून ठेवली आहे.
पुस्तकात आहे असा उल्लेख
डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी एक वेळेस पाकिस्तानमधील आपल्या गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासंदर्भात राज्यसभा खासदार राजीव शुक्ला यांनी आपले पुस्तक Scars Of 1947: Real Partition Stories मध्ये उल्लेख केला आहे. त्या पुस्तकानुसार, डॉक्टर मनमोहनसिंग पाकिस्तानमधील आपल्या गावी जाऊ इच्छित होते. जेव्हा त्यांना विचारण्यात आले तुम्ही तुमचे घर पाहायचे आहे का? तेव्हा ते म्हणाले, माझे कधीच गेले. परंतु ज्या शाळेत माझे चौथीपर्यंत शिक्षण झाले, ती शाळा मला पाहायची आहे. परंतु पंतप्रधान असताना किंवा त्यानंतर कधीही ते त्या ठिकाणी जाऊ शकले नाही.
शाळेला दिले नाव
मनमोहन सिंग 2004 मध्ये भारताचे पहिली गैर हिंदू पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांचे गाव चर्चेत आले. पंजाब सरकारने 2007 मध्ये गाह गावाला आदर्श गाव बनवण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्या शाळेत मनमोहन सिंग यांचे शिक्षण झाले त्या शाळेला गव्हर्नमेंट बॉयज प्रायमरी स्कूल नाव दिले. त्या शाळेत मनमोहन सिंग यांची शाळेची कागदपत्रे आणि निकालचे गुणपत्रिके आहेत. त्या गावातील लोकही मनमोहन सिंग यांची खूप आठवण करतात. कारण त्यांच्यामुळे त्या गावाचा विकास झाला आणि गाव आदर्श झाले.