Corona Drug : 5 दिवसांत कोरोनाचा नामोनिशान संपवणार, भारतीय शास्रज्ञांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा

केंद्रीय औषध अनुसंधान केंद्र म्हणजेच ( CDRI ) सीडीआरआयसीच्या शास्रज्ञांनी कोरोनावर ( Corona ) मात करणारं औषध ( corona drug ) शोधल्याचा दावा केला आहे. हे देशातील पहिलं अँटीव्हायरल ड्रग ( Antiviral drug) असणार आहे, ज्याद्वारे कोरोना ( Covid  ) उच्चाटनाचा दावा केला जात आहे.

Corona Drug : 5 दिवसांत कोरोनाचा नामोनिशान संपवणार, भारतीय शास्रज्ञांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा
corona test
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 3:05 PM

नवी दिल्ली: केंद्रीय औषध अनुसंधान केंद्र म्हणजेच ( CDRI ) सीडीआरआयसीच्या शास्रज्ञांनी कोरोनावर ( Corona ) मात करणारं औषध ( corona drug ) शोधल्याचा दावा केला आहे. हे देशातील पहिलं अँटीव्हायरल ड्रग ( Antiviral drug) असणार आहे, ज्याद्वारे कोरोना ( Covid  ) उच्चाटनाचा दावा केला जात आहे. या औषधाचं नाव आहे उमिफेनोविर.( Umifenovir Drug) CDRIच्या दाव्यानुसार, आतापर्यंत 132 कोरोना रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला, ज्यात या औषधाने कमाल केल्याचा दावा शास्रज्ञांनी केला आहे. ( Scientists at CDRI claim to have discovered a new drug on corona, Umifenovir drug to cure corona in 5 days )

CDRI च्या शास्रज्ञांच्या दावानुसार हे औषध कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवरही काम करण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण, डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांवर उमिफेनोवीर हे औषध काम करत असल्याचं दिसलं आहे. CDRIच्या शास्रज्ञांचा दावा आहे की, हे औषध 5 दिवसांत रुग्णाच्या शरीरातील कोरोनाला संपवतं.

प्रयोगिक तत्त्वावर सध्या उमिफेनोविरचा उपयोग

CDRIचे संचालक तपस कुंडू यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारी आल्यानंतर संस्थेच्या 16 सदस्यांनी हे औषध प्रायोगिक तत्त्वावर कोरोना रुग्णांना देण्याची मागणी केली. 3 पातळ्यांवर हा प्रयोग झाला, ज्यात कमी लक्षणं असणाऱ्या आणि लक्षणं नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर उमिफेनोविर प्रभावी ठरल असल्याचं दिसलं. या औषधाने कोरोनाचा रुग्णांवरील प्रभाव जवळपास संपुष्टात आणला. या औषधाचा 800MG चा डोस रुग्णांना 5 दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी देण्यात आला. त्यानंतर हे औषध प्रभावी असल्याचं शास्रज्ञांना कळालं.

कोरोनातून लवकर बरं होण्यासाठीची संजवनी

शास्रज्ञांच्या दाव्यानुसार, उमिफेनोविर हे औषध कोरोना रुग्णांना लवकर बरं करण्यास मदत करतं. या औषधाचे परिणाम लगेच दिसायला लागतात. उमिफेनोविरचा प्रयोग करताना 18 ते 75 वर्षांदरम्यानच्या रुग्णांचा व्हॉलंटीअऱ म्हणून वापर करण्यात आला. गोव्याच्या मेडिजेस्ट मेसर्स या कंपनीने हे औषध बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. लवकरच हे औषध गोळ्या आणि सिरपच्या स्वरुपात बाजारात येण्याची शक्यता आहे. उमिफेनोविरची किंमत ही ग्राहकांना परवडेल अशीच असणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून या औषधाचा वापर रशिया, चीनसह अनेक देशात एफ्लुएंजा आणि न्युमोनियाच्या इलाजासाठी केला जात होता.

लहान मुलांसाठीही उमिफेनोविर सुरक्षित

हे औषध लहान मुलांसाठीही सुरक्षित असल्याचा दावा CDRI च्या शास्रज्ञांनी केला आहे. शास्रज्ञांच्या मते हे औषध गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी सुरक्षित आहे. उमिफेनोवीर हा कोरोनाच्या सेल्स कल्चरला प्रभावीपणे नष्ट करतो. शिवाय, मानवी कोषिकांमध्ये कोरोनाचा होणारा प्रवेशही हे औषध रोखतं. 5 दिवसांच्या उमिफेनोविर या औषधाचा खर्च 600 रुपयांपर्यंत येऊ शकतो. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआई ने या औषधाच्या आपात्कालिन वापराला मंजुरी देण्याचं सांगितलं असल्याचंही शास्रज्ञांनी सांगितलं आहे.

हेही वाचा:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट

दिवसभर लॅपटॉपला चिपकून राहताय?; सावधान! नाहीतर अकाली म्हातारे व्हाल!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.