सूर्यावर पृथ्वीच्या 20 पट इतका मोठा खड्डा, नंतर मोठं सौरवादळ, शास्त्रज्ञानांची धाकधूक वाढली
सूर्याच्या पृष्ठभागावर 20 पृथ्वी मावतील इतका मोठा खड्डा पडल्यामुळे शास्त्रज्ञ आणि अंतराळ संशोधक संस्था चिंतेत पडल्या आहेत.
मुंबई : सूर्याच्या पृष्ठभागावर वाढलेल्या हालचालींनी पुन्हा एकदा शास्त्रज्ञांची धाकधूक वाढवली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर जवळपास 20 पृथ्वी मावतील इतका मोठा खड्डा पडलाय. त्यााच खड्ड्यांमुळे तयार झालेलं सौरवादळ पृथ्वीसाठी चिंतेचं विषय ठरु शकतं. या खड्ड्यामुळे निर्माण झालेलं सौरवादळ हे ताशी 129 लाख किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेला सरकतंय. जर दरम्यानच्या काळात या सौरऊर्जाच्या वादळाची दिशा बदलली नाही किंवा हे वादळ पृथ्वीच्या जवळून जरी गेलं तर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या सौरवादळामुळे पृथ्वीच्या कक्षेतील सॅटेलाईटला मोठी हानी होऊ शकते. तसं घडलं तर मोबाईल फोन, जीपीएस यंत्रणेसह अनेक गोष्टी बाधित होऊ शकतात. सूर्याच्या पोटात मोठ्या हालचाली घडत राहतात. मात्र यावेळी जो खड्डा पडलाय त्याचा आकर मोठा असल्याने शास्त्रज्ञ चिंतेत पडला आहे.
वैज्ञानिकांच्या भाषेत सूर्यावरच्या अशा खड्ड्याला कोरोनेल हेल म्हटलं जातं. सूर्यावरचा हा खड्डा एखाद्या ब्लॅक होलसारखा भासतो. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार सूर्यावर पडलेल्या खड्ड्यांची रुंदी ही चार लाख किमी तर लांबी तीन लाख किमी इतकी आहे. यात जवळपास 20 पृथ्वी मावू शकतात.
सूर्यावर सौरवादळ निर्माण झाल्याची बातमी ही गेल्या महिन्यात देखील समोर आली होती. या सौरदावळावर अनेकांची चिंता व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी सूर्याचा एक कडा तुटून बाहेर पडला आणि त्याचं रुपांतर सौरवादळात झाल्याचं बोललं जात होतं. सूर्याच्या भोवती मोठं सौरवादळ सुरु झाल्याच्या बातम्या तेव्हाच आल्या होत्या. तसेच त्यामुळे सॅटेलाईटवर मोठा दुष्परिणाम पडू शकतो, अशी भीती वर्तवली जात होती. त्यानंतर आता सूर्यावर मोठा खड्डा पडल्याची बातमी समोर आली आहे.