Sikkim Flood | सिक्किममध्ये मोठा विद्ध्वंस घडवणाऱ्या पुराचा नेपाळच्या भूकंपाशी काय कनेक्शन?

Sikkim Flood | सिक्किममधल्या पुराने मोठा विद्ध्वंस घडवला आहे. त्याच नेपाळच्या भूकंपाशी काय कनेक्शन आहे?. वैज्ञानिक सध्या सिक्किममध्ये अचानक इतका मोठा पूर कशामुळे आला? त्याचा शोध घेत आहेत.

Sikkim Flood | सिक्किममध्ये मोठा विद्ध्वंस घडवणाऱ्या पुराचा नेपाळच्या भूकंपाशी काय कनेक्शन?
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 12:18 PM

नवी दिल्ली : सिक्किममध्ये 4 ऑक्टोबरला निसर्गाचा कोप दिसून आला. ल्होनक सरोवर परिसरात ढगफुटी झाली. त्यामुळे तीस्ता नदीला पूर आला. त्यामुळे सिक्किममध्ये मोठा विद्ध्वंस झाला. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 22 जवानांसह 102 नागरिक बेपत्ता आहेत. या सगळ्यांचा शोध सुरु आहे. ढगफुटीची ही घटना घडण्याच्या एकदिवस आधी नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमधल्या या भूकंपामुळे सिक्किममध्ये पूर आला का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

नुकताच नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला. त्यात मोठ नुकसान झालं. “नेपाळमधील या भूकंपामुळे सिक्किममध्ये अचानक इतका मोठा पूर आल्याची शक्यता आहे” असं केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) एक वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलय. अधिकाऱ्याने सांगितलं की, “168 हेक्टरमध्ये पसरलेलं ल्होनक सरोवर आधीपासून असुरक्षित होतं. नदीच क्षेत्रफळ आणखी कमी होऊन आता 60 हेक्टर राहिलय” नेपाळच्या भूकंपाशी खरच काही कनेक्शन आहे का?

नेपाळमधील भूकंप सिक्किममधल्या पुराच कारण असू शकतो असं काही एक्सपर्ट्सच मत आहे. वैज्ञानिक सध्या सिक्किममध्ये अचानक इतका मोठा पूर कशामुळे आला? त्यामागे काय कारण आहेत? नेपाळच्या भूकंपाशी खरच काही कनेक्शन आहे का? याचा शोध घेत आहेत. सध्या सिक्किममध्ये मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढल जातय. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवल जातय. प्रशासन आणि सैन्य मदत कार्यात गुंतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी फोनवरुन चर्चा केली व शक्य ती सर्व मदत करण्याच आश्वासन दिलय.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.