‘ती माझ्या पतीच्या मागे लागलीय’, महिला IAS-IPS अधिकाऱ्यांच्या भांडणात 2 ऑडिओ क्लिपमधूम महत्त्वाचे खुलासे
कर्नाटकातील दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमधील कडाक्यचं भांडण चव्हाट्यावर आलेलं आहे. दोन्ही महिला अधिकारी एकमेकांवर उघडपणे गंभीर आरोप करत आहेत. हे प्रकरण इतकं वाढलं की सरकारने दोघांची बदली करावी लागलीय.
बंगळुरु : आपण आपल्या आयुष्यात आयपीएस (IPS) किंवा आयएएस (IAS) अधिकारी बनावं असं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक जण ती स्वप्न पूर्ण देखील करतात. तर अनेक जण त्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करतात. अनेकांना त्यात यश मिळतं. अनेक यशस्वी आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याकडून तरुणांना प्रेरणा मिळते. आपणही तसंच काहीतरी बनावं, असं वाटतं. पण सध्या कर्नाटकात दोन महिला आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या वादातून तरुणांनी काय प्रेरणा घ्यावी? असा मुद्दा उपस्थित होतोय. संबंधित प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. या दोन वरिष्ठ पातळीवरच्या महिला अधिकाऱ्यांमध्ये वादामागचं नेमकं कारण काय आहे ते स्पष्ट करणाऱ्या दोन ऑडिओ क्लिप ‘टीव्ही 9 कन्नड’च्या हाती लागल्या आहेत.
कर्नाटकातील दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमधील कडाक्यचं भांडण चव्हाट्यावर आलेलं आहे. दोन्ही महिला अधिकारी एकमेकांवर उघडपणे गंभीर आरोप करत आहेत. हे प्रकरण इतकं वाढलं की सरकारने दोघांची बदली करावी लागलीय. आता ‘टीव्ही 9 कन्नड’च्या हाती एक एक्सक्लूझिव्ह माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये आयपीएस डी रुपा मौदगिल आणि आयएएस रोहिणी सिंधूरी यांच्यातील वादाचं कारण समोर आलंय. या प्रकरणाशी संबंधित दोन ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर नेमकं प्रकरण काय ते समोर आलंय.
नेमकं प्रकरण काय?
आयपीएस रुपा मौदगिल यांनी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याशी बातचित करतानाची ऑडिओ क्लिप समोर आलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये रुपाने खुलासा केलाय की, आयएएस रोहिणी तिच्या पतीच्या मागे लागली आहे. रुपा यांचे पती एक आयएएस अधिकारी आहेत. याशिवाय सर्व्हे सेटलमेंट अँड लँड रेकॉर्ड्सचे कमिश्नरदेखील आहेत.
विशेष म्हणजे आयएएस रोहिणी यांनी रुपा यांच्या पतीचा वापर करुन जमीन संबंधित अनेक कामे करुन घेतले आहेत, अशी देखील माहिती समोर येतेय. रोहिणी यांचं कुटुंब लँड डील आणि बांधकाम व्यवसायात आहे, असा दावा रुपा यांनी केलाय. रुपा यांनी रोहिणी यांना कॅन्सर म्हटलं आहे. तसेच रोहिणि यांनी अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करुन टाकलंय, असा गंभीर आरोप रुपा यांनी केला.
रुपा यांनी फेसबुकवर देखील रोहिणी यांच्यावर निशाणा साधलाय. “प्रिय मीडिया, रोहिणी सिंधूर यांच्याविरोधात मी भ्रष्टाचाराचे जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर कृपया लक्ष द्यावं. मी कधीच कुणालाही भ्रष्टाचाराविरोधात लढण्यास रोखलं नाही. कर्नाटकात एका आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू होतो, तामिळनाडूत आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू होतो. तर कर्नाटकात एक आयपीएस पती-पत्नी यांच्यात आधीपासूनच घटस्फोट झालेला आहे. या पॅटर्नचा तपास व्हायला हवा”, अशी मागणी रुपा यांनी केलीय.
“माझे पती अजूनही माझ्यासोबत आहेत. आम्ही अजूनही एकत्र आहोत. तुम्ही कोणताही अंदाज बांधू नका. आमच्या कुटुंबाला अडथळा ठरणाऱ्या गुन्हेगाराची चौकशी करा. अन्यथा आणखी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होतील. मी एक मजबूत महिला आहे, मी लढणार आहे. मी सर्व पीडित महिलांसाठी लढत आहे. सर्व महिलांमध्ये लढण्याची शक्ती सारखी नसते, कृपया अशा महिलांचा आवाज व्हा. भारत कौटुंबिक मूल्यांसाठी ओळखला जातो”, असं रुपा म्हणाल्या.
रुपा यांच्याकडून रोहिणी यांचे खासगी फोटो शेअर
दरम्यान, रुपा यांनी सोशल मीडियावर रोहिणी यांचे खासगी फोटो देखील शेअर केले होते. तसेच तिने फोटो पुरुष अधिकाऱ्यांसोबत शेअर केले होते, असा दावा केला होता. तर दुसरीकडे रोहिणी यांनी रुपा यांच्याकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. “रुपा यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं रोहिणी म्हणाल्या आहेत. एका जबाबदार पदावर असलेल्या रूपा वैयक्तिक द्वेषातून आपल्या विरोधात अशा कमेंट करत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं ते वागत आहेत”, अशी भूमिका रोहिणी यांनी मांडली आहे.