Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापर्यंत अयोध्या पूर्णपणे सील, SPG-NSG जवानांचा कडा पहारा

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त अयोध्येत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. (Security in Ayodhya for Ram Mandir Bhoomi Pujan).

Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापर्यंत अयोध्या पूर्णपणे सील, SPG-NSG जवानांचा कडा पहारा
Follow us
| Updated on: Aug 05, 2020 | 8:14 AM

अयोध्या : देशभरात आज (5 ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आनंद साजरा केला जात आहे (Security in Ayodhya for Ram Mandir Bhoomi Pujan). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे.

राम मंदिर भूमिपूजनाच्या आजच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज हे मंचावर उपस्थित असणार आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राम मंदिर के पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11.30 वाजता अयोध्येत पोहचतील. भूमिपूजनचा शुभ मुहूर्त 12.44 वाजता आहे. राम जन्मभूमि परिसर आणि आजूबाजूच्या भागाला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे देण्यात आली आहे. या ठिकाणच्या सुरक्षेसाठी प्रवेश करताना सिक्यूरिटी कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. ते कोड एकदाच वापरता येणार आहेत. तसेच पोलीस उपस्थितांच्याही तपासण्या करणार आहेत.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. कोणत्याही वाहनाला येण्याजाण्यासाठी परवानगी नाही. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम होईपर्यंत कुणालाही अयोध्येत जाण्याची परवानगी नाही. माध्यमांना देखील केवळ राम पेढी येथील मीडिया सेंटरपर्यंत जाण्याची परवानगी आहे. अयोध्येत जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून अडवले आहेत. साकेत महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर थेट एसपीजी आणि एनएसजीच्या जवानांचा कडेकोट पहारा आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

उपस्थितांना कार्यक्रमादरम्यान पोलीस तपासात ओळखपत्रही दाखवावे लागेल. मोदींच्या आगमनाच्या 2 तासापूर्वीपर्यंत आमंत्रितांना पोहचायचे आहे.

अयोध्येत प्रस्तावित असलेल्या राम मंदिराच्या ‘भूमिपूजनाचा’ कार्यक्रम आज दुपारी 12.30 वाजता सुरु होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ‘शिला पूजन’, ‘भूमि पूजन’ आणि ‘कर्म शिला पूजन’ होईल. मुख्य पूजा दुपारी 12.44 आणि 12.45 वाजल्याच्या दरम्यान 32 सेकंदांच्या काळात होईल. याला ‘अभिजीत मुहूर्त’ म्हणतात. याच मुहूर्तात प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता. पंतप्रधान मंदिर निर्माणाच्या सुरुवातीला प्रतिकात्मकपणे 40 किलो चांदीच्या विटा ठेवतील. यासाठी मोदी अयोध्येत जवळपास 3 तास असतील, असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा प्रसाद दुतावासांमार्फत जगभर वाटणार, अयोध्येत 1 लाख 11 हजार लाडूंची तयारी

अमित शाहांना कोरोना, आता जनतेला क्वारंटाईन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? काँग्रेसचा सवाल

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका

Security in Ayodhya for Ram Mandir Bhoomi Pujan

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.