सीमा हैदरने पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले; व्हिडिओ जारी करत म्हणाली ‘ जे करायचं ते करा…’

देशभरात चर्चेत असलेल्या सीमा हैदर प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानने केलेल्या व्यक्तव्याबाबत सीमाने व्हिडिओ जारी करत उत्तर दिले आहे.

सीमा हैदरने पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले; व्हिडिओ जारी करत म्हणाली ' जे करायचं ते करा...'
सीमा हैदरकडे सापडले दोन पासपोर्ट
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 1:07 PM

नोएडा / 16 जुलै 2023 : सध्या देशभरात पाकिस्तानातून भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर प्रकरण चर्चेत आहे. आपल्या प्रियकरासाठी सीमा हैदर ही महिला आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली. सीमा भारतात आल्याचे उघड होताच पोलिसांनी कारवाई करत तिच्या प्रियकरासह तिला अटक केली. यानंतर जामिनावर त्यांची सुटकाही केली. मात्र या प्रकरणामुळे देशभरात चर्चांना उधाण आले. पाकिस्तानी मीडियाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारने आपली प्रतिक्रिया दिली होती. यानंतर सीमाने एक व्हिडिओ जारी करत पाकिस्तानला उत्तर दिले आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हणाली सीमा?

पाकिस्तानसाठी जारी केलेल्या व्हिडिओत कडक शब्दात उत्तर दिले आहे. सीमा म्हणाली, ‘माझा एक व्हिडिओ पाकिस्तानींसाठी आहे. हवं ते करा. पाहिजे तितके आरोप करा. येथील एजन्सी प्रत्येक बाब क्लिअर करत आहे. इथे सर्व बाबी क्लिअर होताच मी माझा पती सचिनसोबतच राहणार आणि त्याच्यासोबत जगणार आणि त्याच्यासोबतच मरणार.’ ‘कुणी काहीही म्हणो, काहीही होऊ शकत नाही. कारण माझे प्रेम, माझे सर्वस्व माझा सचिनच आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि हो, मी हिंदू आहे, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. मी भारतात आले, एक दिवस सगळे माझे प्रेम स्वीकारतील’, असेही सीमा म्हणाली.

सीमा हैदर आता भारतालाच आपला देश मानते. नेपाळमध्ये मंदिरात तिने सचिनसोबत विवाह केल्याचा दावा केला आहे. सचिनच्या कुटुंबीयांना सीमाला कुणाला भेटण्यास मनाई केली आहे. सीमा दिवसातील 18 तास सोशल मीडिया आणि मीडियाशी संवाद करण्यात घालवते. यामुळे ती खाण-पिणं करु शकत नाही. परिणामी तिची तब्येत बिघडत चालली आहे, असे सचिनच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.