Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider | पाकिस्तानी नवऱ्याला धोका देऊन भारतीय प्रियकराकडे आलेली सीमा हैदर खरोखर ‘गुप्तहेर’ आहे का?

Seema Haider | सीमा हैदर घरचा नाही, तर देशाचा उंबरठा ओलांडून खरच प्रेमासाठी आली की, अजून काही? असा संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे. सीमा हैदरची ही लव्ह स्टोरी काही जणांना खरी वाटतेय.

Seema Haider | पाकिस्तानी नवऱ्याला धोका देऊन भारतीय प्रियकराकडे आलेली सीमा हैदर खरोखर 'गुप्तहेर' आहे का?
seema haiderImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 3:18 PM

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर सीमा हैदरची चर्चा आहे. पाकिस्तानी नवऱ्याला सोडून भारतीय प्रियकराकडे आलेल्या सीमा हैदरवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. आपण फक्त प्रेमासाठी पाकिस्तानसोडून भारतात आलो, असा सीमा हैदरचा दावा आहे. पण प्रत्यक्षात समोर येणारी माहिती ती सांगत असलेल्या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिचा खोटेपणा उघडा पडत चाललाय. त्यामुळे सीमा हैदर घरचा नाही, तर देशाचा उंबरठा ओलांडून खरच प्रेमासाठी आली की, अजून काही? असा संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे.

सीमा हैदरचे तिचा प्रियकर सचिन मीणासोबतचे अनेक रोमॅटिंक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सीमा हैदरची ही लव्ह स्टोरी काही जणांना खरी वाटतेय, तर काही जण त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत.

प्रश्न का निर्माण होतायत?

सीमा हैदर म्हणते ती 5 वी पास आहे. पण तिची इंग्रजी भाषेवर उत्तम पकड आहे. 5 वी पर्यंत शिक्षण झालं असलं, तरी ती कॉम्प्युटर आणि मोबाइल चालवण्यात एक्सपर्ट आहे. त्याशिवाय तिने पाकिस्तानात 12 लाख रुपयात आपली जमीन विकली. त्यानंतर दुबईहून नेपाळमार्गे ती भारतात दाखल झाली. आता एक पाचवी शिकलेली महिला हे सर्व कसं करु शकते? हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्याशिवाय ती आपल्या निकाहबद्दलही खोट बोलत आहे.

समोर आलेली माहिती परस्पर विरुद्ध

पाकिस्तानी गुलाम हैदरसोबत तिचं लग्न कुठल्याही दबावाशिवाय झालं होतं, हे तिच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालय. सीमा हैदर आपण किती सोशिक आहोत, आपल्यावर किती अन्याय झालाय हे दाखवण्याचा प्रयत्न करतेय. पण प्रत्यक्षात तिच्याबद्दलची आतापर्यंतची समोर आलेली माहिती परस्पर विरुद्ध आहे.

ती जे दाखवतेय, ती तशी नाहीय

सोशल मीडियावरील चर्चेत तिला पाकिस्तानी हेर ठरवलं जात आहे. सीमा हैदरपासून भारतीय सुरक्षेला धोका आहे, असं बहुतांश नेटीझन्सच म्हणणं आहे. सीमा हैदर ती साधी-भोळी असल्याचा आव आणतेय, पण ती जे दाखवतेय, ती तशी नाहीय, असाच सोशल मीडियाचा सूर आहे.

सीमा खरच पाकिस्तानी गुप्तहेर आहे का?

सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर आहे का? या प्रश्नाच उत्तर सध्या तरी नाही असंच दिसतय. कारण गुप्तहेर असा, आपली ओळख सार्वजनिक करुन देशात प्रवेश करत नाही. त्याच्या सगळ्याच कारवाया गुप्तपणे चालतात. त्याचे टार्गेट्सही ठरलेले असतात. सध्या सीमा हैदरच्या बाबतीत असं कुठलही टार्गेट दिसत नाही.

ती फाडफाड इंग्रजी बोलते, तिला कॉम्प्युटरच नॉलेज आहे हा मुद्दा आहे. पण यावरुन ती गुप्तहेर आहे, असं ठामपणे म्हणता येणार नाही. गुप्तहेर कुठल्याही वेशात असू शकतो. तो कुणाला कुठला थांगपत्ता लागू न देता काम करणारा असू शकतो किंवा मिळून-मिसळून राहणारा असू शकतो. पण मिशनसाठी आलेला कुठलाही गुप्तहेर स्वत:ची ओळख का सार्वजनिक करेल?

सीमा हैदरच्या भारतात येण्यामागे खरं कारण काय?

सीमा हैदरच्या भारतात येण्याला पाकिस्तानातील महिलांची परिस्थिती जबाबदार असू शकते. पाकिस्तानात महिलांना भारताइतके स्वातंत्र्य नाहीय, त्यांच्यावर अनेक बंधन आहेत. त्यातुलनेत भारतीय वातावरणात खूप मोकळेपणा आहे. याच कारणामुळे सीमा हैदर भारताल आलेली असू शकते.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.