Seema Haider | फाडफाड इंग्लिश, अजून बरच काही… सीमा धोकेबाज? ‘हे’ 5 झोल करतायत तिची पोलखोल

Seema Haider | सीमा हैदरच्या पासपोर्टपासून तिच्या शिक्षणापर्यत अनेक प्रश्न विचारले जातायत. सीमा हैदरच्या 5 खोट्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमकथेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.

Seema Haider | फाडफाड इंग्लिश, अजून बरच काही... सीमा धोकेबाज? 'हे' 5 झोल करतायत तिची पोलखोल
सीमा हैदरकडे सापडले दोन पासपोर्ट
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 3:20 PM

नवी दिल्ली : दीवानगी में हम कुछ ऐसा कर जाएंगे, मोहब्बत में सारी हदें पार कर जाएंगे…. पाकिस्तानातून लपून-छपून भारतात आलेल्या सीमा हैदरला या ओळी तंतोतंत लागू पडतात. सचिन मीणा हा सीमाच प्रियकर भारतीय आहे. त्याला भेटण्यासाठी सीमाने फक्त घराचा उंबरठा ओलांडला नाही, तर देशाच्या सीमा ओलांडून ती भारतात आली. सीमा हैदर भारतात दाखल झाल्यापासून ती टीव्ही प्राइम टाइमचा भाग बनलीय.

सीमा हैदरची ही लव्ह स्टोरी काही जणांना खरी वाटतेय, तर काही जण त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. सीमा हैदरच्या पासपोर्टपासून तिच्या शिक्षणापर्यत अनेक प्रश्न विचारले जातायत. सीमा हैदरच्या 5 खोट्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमकथेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.

1- सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात दाखल झाली, त्यावर पाकिस्तानी यूट्यूबर शोएब मलिकने प्रश्नचिन्ह निर्माण केलय. सीमा पाकिस्तानी एजंट असू शकते, तिला कुठल्यातरी स्पेशल मिशनसाठी पाठवलेले असू शकतं, असं शोएब मलिकच म्हणणं आहे. काही लोकांनी यूट्यूबरचा मुद्दा खोडून काढला. पाकिस्तानात महिलांच्या स्थितीबद्दल त्याला उलटे प्रश्न विचारले.

2 सीमा हैदर म्हणते ती 5 वी पास आहे. पण तिची इंग्रजी भाषेवर उत्तम पकड आहे. पबजी खेळताना नोएडाच्या सचिन बरोबर बोलणं सुरु झालं, असं सीमाने सांगितलं. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, त्यानंतर ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. स्वत:चा वीजा सीमाने स्वत:च बनवलाय, या प्रक्रियेतून जाणं सीमासाठी अजिबात सोपं नव्हतं. त्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण होतायत.

3 सीमा हैदर भले 5 वी शिकली असेल, पण कॉम्प्युटर आणि मोबाइल चालवण्यात ती एक्सपर्ट आहे. पबजी खेळण्यात माहीर असलेल्या सीमाला मोबाइलवरुनच सचिनवर प्रेम जडलं. सचिन आणि सीमा दोघे दररोज दोन ते तीन तास पबजीवरुन चॅटिंग करायचे. भारतात आल्यानंतर ती दुसऱ्या हॉट स्पॉटवरुन सचिनशी बोलली.

4 सीमा हैदरच प्रतिज्ञापत्र समोर आलय. त्यातून सीमाचा खोटेपणा उघड झालाय. पाकिस्तानी गुलाम हैदरसोबत तिचं लग्न कुठल्याही दबावाशिवाय झालं होतं, हे त्यातून स्पष्ट होतं. गुलाम हैदरशी लग्न करण्याच्या 10 दिवस आधी तिने आपल्या वडिलांच घर सोडलं होतं. कारण कुटुंबीय तिच्या मर्जी विरोधात तिचं लग्न लावून देत होते.

5 सीमाचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात असल्याच तिने स्वत: सांगितलय. त्यामुळे सीमाच्या लव्ह स्टोरीबद्दल संशय निर्माण होतो. सीमाने मीडियाशी बोलताना सांगितलं की, तिने 12 लाख रुपयात आपली जमीन विकली. त्यानंतर दुबईहून नेपाळमार्गे ती भारतात दाखल झाली. सीमा जितक्या सहजतेने बोलतेय, पण हे तितकं सोपं नाहीय.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.