Covovax Vaccine | 7 ते 11 वयोगटासाठी कोवोव्हॅक्स लसला मिळाली परवानगी, डीसीजीआयचा महत्वाचा निर्णय!
16 मार्चपासून देशात 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. भारताने गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांसाठी लसीकरण सुरू केले.
मुंबई : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सिरम इन्स्टिट्यूटच्या (Serum Institute) कोवोव्हॅक्स लसीचा 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. इतकेच नाही तर 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठी मंजुरी (Approval) दिली, असल्याचे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. इतर MRNA लस उप-शून्य तापमानात संग्रहित करणे आवश्यक असताना, जेनोव्हाची MRNA लस 2-8 अंशांवर संग्रहित केली जाऊ शकते, असे अधिकृत सूत्राने पीटीआयला सांगितले.
कोवोव्हॅक्सला 7 ते 11 वर्षे वयोगटासाठी परवानगी
सीरम इन्स्टिट्यूटच्या COVID-19 लस कोवोव्हॅक्सला 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये काही अटींच्या अधीन राहून प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. सीएसडीसीओच्या COVID-19 वरील विषय तज्ञ समितीने गेल्या आठवड्यात 7 ते 11 वर्षे वयोगटासाठी कोवोव्हॅक्स आणि 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयासाठी जेनोव्हाच्या दोन डोस एम-आरएनए लसींना आपत्कालीन वापराची परवानगी देण्याची शिफारस केल्यानंतर डीसीजीआयचा होकार मिळाला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
संदर्भात सीएसडीसीओकडे अर्ज सादर केला होता
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 16 मार्च रोजी या संदर्भात सीएसडीसीओकडे अर्ज सादर केला होता. तज्ज्ञ समितीने एप्रिलमधील शेवटच्या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूटकडून अर्जावर अधिक डेटा मागवला होता. सीएसडीसीओने 28 डिसेंबर रोजी वयस्कर आणि 12 ते 17 वर्षे वयोगटातील काही अटींच्या अधीन 9 मार्च रोजी आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी Covovax ला मान्यता दिली होती.
लसीकरणाचा विस्तार वाढवण्यावर भर
16 मार्चपासून देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. भारताने गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांसाठी लसीकरण सुरू केले. त्यानंतर सरकारने परवानगी देऊन लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.