कल्याणसह या रेल्वे स्थानकांत मेल-एक्सप्रेसना प्रायोगिक थांबा, पाहा कोणत्या गाड्या
मध्य रेल्वेवरील खालील मेल-एक्सप्रेस गाड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : मध्य रेल्वेने कल्याण रेल्वे स्थानकात सहा महिन्यांसाठी प्रायोगित तत्वावर खालील गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेस, पाटणा-सीएसएमटी सुविधा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, उदयपूर शहर-म्हैसूर हमसफर एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या दोन्ही दिशांच्या अप आणि डाऊन ट्रेनना कल्याण स्थानकात थांबा मिळाला आहे.
मध्य रेल्वेवरील खालील मेल-एक्सप्रेस गाड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे
कल्याण स्थानकात या गाड्यांना थांबा
- ट्रेन क्र. 12261 सीएसएमटी -हावडा दुरांतो एक्स्प्रेस 23 ऑगस्टपासून कल्याण येथे सायं. 5.59 वाजता येईल आणि सायं.6.01 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र. 12262 हावडा-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला स.7 वाजता पोहोचेल आणि 7.02 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र. 82355 पाटणा- सीएसएमटी सुविधा एक्सप्रेस प्रवास दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला दु. 1.33 वाजता येईल आणि दु.1.35 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र. 82356 सीएसएमटी – पाटणा सुविधा एक्सप्रेस प्रवास दि. 25 ऑगस्टपासून कल्याणला दु. 12 वाजता येईल आणि 12.02 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र.18519 विशाखापट्टणम- एलटीटी एक्सप्रेस दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला पहाटे 3.20 वाजता येईल आणि 3.22 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र.18520 एलटीटी – विशाखापट्टणम एक्स्प्रेस दि. 25 ऑगस्टपासून कल्याणला स. 7.32 वाजता पोहोचेल आणि स. 7.34 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र.19667 उदयपूर शहर-म्हैसूर हमसफर एक्सप्रेस 28 ऑगस्टपासून कल्याणला दु.2.02 वाजता पोहोचेल आणि दु. 2.05 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र.19668 म्हैसूर- उदयपूर सिटी हमसफर एक्सप्रेस दि. 24 ऑगस्टपासून कल्याणला स. 10.57 वा. वाजता पोहोचेल आणि स.11 वाजता सुटेल.
- ट्रेन क्र.17221 काकीनाडा पोर्ट – एलएलटी एक्सप्रेस दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला स. 10.09 वाजता पोहोचेल आणि स.10.11 वाजता निघेल.
- ट्रेन क्र.17222 एलटीटी – काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेसचा दि. 24 ऑगस्टपासून कल्याणला 14.03 वाजता पोहोचेल आणि 14.05 वाजता सुटेल
-
होटगी स्टेशनात थांबा
- 17319 हुब्बली – हैदराबाद एक्सप्रेस दि. 23 ऑगस्टपासून पहाटे 4.20 वाजता पोहोचेल आणि 4.30 वाजता सुटेल.
- 17320 हैदराबाद-हुबली एक्स्प्रेस दि. 23 ऑगस्टपासून रात्री 10.15 वाजता पोहोचेल आणि रा.10.25 वाजता सुटेल.
-
कोपरगाव स्टेशन थांबा
- 18503 विशाखापट्टणम – साईनगर शिर्डी एक्सप्रेस दि. 24 ऑगस्टपासून स.9.53 वाजता पोहोचेल आणि स.9.55 वाजता सुटेल.
- 18504 साईनगर शिर्डी -विशाखापट्टणम एक्सप्रेस दि. 25 ऑगस्टपासून रा. 8.08 वाजता पोहोचेल आणि रा. 8.10 वाजता सुटेल.
कान्हेगाव स्टेशन थांबा
- 11409 दौंड- निजामाबाद एक्स्प्रेस दि. 23 ऑगस्टपासून रा. 7.58 वाजता पोहोचेल आणि रा. 8 वाजता सुटेल.
- 11410 निजामाबाद-दौंड एक्स्प्रेस दि. 24 ऑगस्टपासून दु. 12.08 वाजता पोहोचेल आणि 12.10 वाजता सुटेल.
नागपूर स्टेशन थांबा
- 12213 यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिला दुरंतो एक्सप्रेस दि. 26 ऑगस्टपासून सायं. 4.15 वाजता पोहोचेल आणि सायं. 4.20 वाजता सुटेल.
- 12214 दिल्ली सराई रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्सप्रेस दि. 28 ऑगस्टपासून दु.1.25 वाजता पोहोचेल आणि दु. 1.30 वाजता सुटेल.