Ram Mandir Pran Pratishtha | प्राण प्रतिष्ठेआधी अचानक शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे बदलले सूर, आता म्हणतात….
Ram Mandir Pran Pratishtha | अयोध्येत आज प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. 500 वर्षानंतर अयोध्येत भव्य राम मंदिराच स्वप्न साकार होत आहे. या सोहळ्याला काही शंकराचार्यांचा विरोध आहे. त्यामागे त्यांनी धर्म, शास्त्राच कारण दिलय. आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे सूर अचानक बदलले आहेत.
Ram Mandir Pran Pratishtha | आज अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. जगातील कोट्यवधी राम भक्त या क्षणाची आतुरतेने वाट पाहतायत. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे सूर बदलले. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिराबद्दल मोठ वक्तव्य केलं होतं. अपूर्ण बनलेल्या मंदिरात प्रभूरामांची प्राण प्रतिष्ठा न्यायसंगत नाहीय तसेच याला धर्माची मान्यता नाहीय असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते. आम्ही नरेंद्र मोदी यांचे विरोधक नाही, तर हितचिंतक आहोत. त्यामुळे आम्ही त्यांना शास्त्रमान्य कार्य करण्याचा सल्ला देत आहोत असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते. याआधी तत्कालीन परिस्थितीनुसार विनामुहूर्त राम मुर्तीची 1992 मध्ये स्थापना झाली होती. पण वर्तमानपरिस्थितीत वेळ अनुकूल आहे. त्यामुळे योग्य मुहूर्त आणि वेळेची वाट पाहिली पाहिजे, असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते.
आता प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे सूर बदलले आहेत. त्यांनी पीएम मोदींच कौतुक केलं. “आमचा मोदींना विरोध नाहीय. ते पंतप्रधान बनल्यामुळे भारतातल्या हिंदुंमध्ये स्वाभिमान जागा झालाय. आम्ही कोणावर टीका करत नाहीय, आम्ही त्यांच कौतुक करतोय” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. आज 22 जानेवारी 2024 सोमवारी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्याच्या बरोबर एकदिवस आधी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य समोर आलय.
हिंदुंसाठी इतक्या दृढतेने उभा असलेला कुठला पंतप्रधान आहे?
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती रविवारी म्हणाले की, “सत्य हे आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यामुळे हिंदुंचा स्वाभिमान जागा झालाय. ही छोटी गोष्ट नाहीय. मी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोललोय की, आम्ही मोदी विरोधी नाही, मोदी प्रशंसक आहोत. कारण स्वतंत्र भारतात कुठला असा पंतप्रधान आहे, जो हिंदुंसाठी इतक्या दृढतेने उभा आहे?. आम्ही कोणावर टीका नाही करतय, पण हिंदू भावनेच समर्थन करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत”