राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेस विरोध करणाऱ्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे बदलले सूर
ram mandir pran pratishtha | मोदी यांनी कलम 370 रद्द केले. तेव्हा मी त्याचे स्वागत केले होते. सामान नागरी कायद्याचे आम्ही समर्थन नाही करत का? श्रीराम जन्मभूमीचा निर्णय आल्यानंतर सरकारने ज्या प्रकार परिस्थिती हाताळली आम्ही त्याचे कौतूक केले नव्हते का? असे सांगत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मोदी यांचे कौतूक केले.
अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात ज्योतिष पीठ के शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रश्न उपस्थित केले होते. शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केला होता. मंदिर अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. ना काशीमधील आचार्य आणि ज्योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी उत्तर दिले आहे. देशातील प्रमुख मंदिरांचे काम अपूर्ण असताना काम झाल्याचे दाखले उदाहरणांसह दिले. यासंदर्भात शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांना पत्रही लिहिले होते. आता शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे सूर बदलले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे.
आता काय म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वर
शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. त्यांनी म्हटले की, मला मोदी विरोधी दाखवण्याचा प्रयत्न माध्यमांकडून केला जात आहे. मी अनेकवेळा सरकारचे कौतूक केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हिंदूच्या स्वाभिमान जागृत झाला आहे. नरेंद्र मोदी यांचा सारखा हिंदूंचे समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही.
हिंदू म्हणून मी कसा विरोधी
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एएनआशी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान हिंदूंचा स्वाभिमान जागा झाला आहे. मी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे की मी मोदीविरोधी नाही. मी नेहमी त्यांचे कौतूक केले आहे. कारण हिंदूंची बाजू इतक्या ठामपणे मांडणारा अजून एकही पंतप्रधान झाला नाही. मी इतर कोणावर टीका करत नाही. पण मोदींची विशेषता मान्य करावी लागणार आहे. हिंदू भावनांचे त्यांनी समर्थक केले आहे. एक हिंदू म्हणून मी कसा विरोधी असू शकतो.
मोदी यांनी कलम 370 रद्द केले. तेव्हा मी त्याचे स्वागत केले होते. सामान नागरी कायद्याचे आम्ही समर्थन नाही करत का? श्रीराम जन्मभूमीचा निर्णय आल्यानंतर सरकारने ज्या प्रकार परिस्थिती हाताळली आम्ही त्याचे कौतूक केले नव्हते का? जेव्हा, जेव्हा हिंदू भावांना बळ मिळतो, तेव्हा आम्हाला आनंद होतो, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले.
हे ही वाचा