Shankaracharya : ‘जर, जात सोडली, तर…’ धीरेन्द्र शास्त्री यांना शंकराचार्यांनी सुनावले खडेबोल

Shankaracharya avimukteshwaranand : धीरेन्द्र शास्त्री यांनी सनातन धर्मातील जाती-पातींविरोधात पदयात्रा काढली आहे. त्याविरोधात हिमालयातील बदरिकाश्रमाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी भूमिका घेतली आहे. त्यांनी बागेश्वर बाबा यांना काही गोष्टी सुनावल्या आहेत.

Shankaracharya : 'जर, जात सोडली, तर...' धीरेन्द्र शास्त्री यांना शंकराचार्यांनी सुनावले खडेबोल
dhirendra shastri
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 1:46 PM

धीरेन्द्र शास्त्री यांनी सनातन धर्मातील जाती-पातींविरोधात पदयात्रा काढली आहे. या यात्रेला हिमालयातील बदरिकाश्रमाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला आहे. धीरेन्द्र शास्त्री एका पक्षाचे एजंट बनलेत, असं शंकराचार्य म्हणाले. त्या पक्षासाठी हिन्दू वोट बँक गोळा करण्याच काम धीरेन्द्र शास्त्रींकडून सुरु आहे अशा शब्दात अविमुक्तेश्वरानंद यांनी टीका केली. “हिंदू धर्म समजणाऱ्यांना जाती आणि वर्ण सनातनाच महत्त्व माहित आहे, हे संपवण्याविषयी बोलणारे हिंदू विरोधी आहेत” असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

‘जाति-पांति की करो विदाई हिन्दू हिन्दू भाई भाई’ असं धीरेन्द्र शास्त्री बोलत आहेत. “तुम्ही जाती-पाती संपवण्याविषयी बोलता, तेव्हा तुम्ही सनातनी राहत नाही” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. तुम्ही सनातनी राहिला नाहीत, तर भाऊ-भाऊ बनून कसे रहाल? असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. धीरेन्द्र शास्त्री पॉलिटिकल एजेंडा घेऊन लोकांमध्ये गेले आहेत, असं अविमुक्तेश्वरानंद यांचं मत आहे.

‘सरकारने केवळ दोन जाती बनवाव्यात’

“वर्णआश्रम मान्य करुन कोणाचा द्वेष करु नये, कोणाला कमीपणा दाखवू नये, यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. जर, जात सोडली, तर ओळख संपून जाईल” असं शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद म्हणाले. धीरेंद्र शास्त्री यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं होतं. “आपल्याला भारतात जात-पात, श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेदभाव मिटवायचा आहे. लोकांच आडनाव असेल, पण सरकारने केवळ दोन जाती बनवाव्यात. त्याचवेळी भारत समृद्ध होईल” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. “भारतात वर्तमानात अंधविश्वास रोखण्याची गरज आहे. आपल्याला सरकारवर अवलंबून रहायच नाहीय. बागेश्वर बाबा हिन्दू राष्ट्र बनवू शकत नाही. भारताच्या प्रत्येक युवा भाऊ-बहिणीने बागेश्वर बाबा बनावं, तेव्हाच हिंदू राष्ट्र निर्मिती होईल” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.