Pawar-Shah Meet : शरद पवारांकडून अमित शाहांचं अभिनंदन, दोन्ही नेत्यांमध्ये साखरेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा
अमित शाह यांच्या कार्यालयात या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सहकार श्रेत्रासह साखर उद्योग आणि त्यावरील प्रश्नांबाबच सविस्तर चर्चा झाली. तशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या कार्यालयात या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सहकार श्रेत्रासह साखर उद्योग आणि त्यावरील प्रश्नांबाबच सविस्तर चर्चा झाली. तशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. या बैठकीला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. (NCP President Sharad Pawar and Union Co-Operative Minister Amit Shah meeting)
पवार आणि शाह यांच्या बैठकीत प्रामुख्याने सहकारी साखर कारखान्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे? देशातील साखरेती सध्याची स्थिती आणि साखरेच्या जास्त उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा झाल्याचं पवार यांनी आपल्या ट्वीटमधून सांगितलं आहे.
Firstly, I congratulated Shri Amit Shah on being appointed as the first Co-operation Minister of India. During the meeting, We discussed the current sugar scenario of the country and problems occurring due to excessive sugar production.@AmitShah#Meeting #NewDelhi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021
इथेनॉलबाबत लवकरच नवं धोरण?
पवार आणि शाह यांच्यातील बैठकीत साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याची मागणीही केली गेलीय. त्यावर सरकार इथेनॉलबाबत लवकरच नवं धोरण आणण्याच्या विचारात असल्याची माहिती अमित शाह यांनी दिलीय. दरम्यान, या बैठकीत अन्य राज्यकीय मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. त्यात महत्वाचा मुद्दा NDRF च्या निकशांमध्ये बदल करण्यासंदर्भातला होता.
- नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाख रुपये देतं तर केंद्र सरकार 2 लाख रुपये. यात बदल करुन केंद्राने 4 किंवा 5 लाख रुपयांची मदत दिली जावी. त्यामुळे राज्य सरकारवरील बोजा कमी होईल.
2. पूरग्रस्त भागात घरांचं नुकसान झाल्यास राज्य सरकार दीड लाख रुपये देतं तर केंद्र सरकार 90 हजार रुपये. त्यात बदल करण्यात यावा.
3. एनडीआरएफचा कॅम्प महाडमध्ये स्थापन केला जावा. एनडीआरएफ कॅम्प मुंबई आणि पुण्यात आहे. मात्र, त्यांची जास्त गरज कोकणात आहे.
संबंधित बातम्या :
आधी तटकरेंच्या उपस्थितीत शरद पवार-अमित शाहांची बैठक, मग तटकरेंशिवाय वेगळी चर्चा!
राहुल गांधी शिवसेनेला समजून घेतायत की शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतंय? वाचा सविस्तर
NCP President Sharad Pawar and Union Co-Operative Minister Amit Shah meeting