PM Modi Sharad Pawar Meet: ईडीचे रेड ते राज ठाकरेंचा ‘हिंदूत्ववादी भोंगा’; ते पाच कारणे ज्यासाठी शरद पवार-मोदी भेट अत्यंत महत्त्वाची

PM Modi Sharad Pawar Meet: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी तब्बल 25 मिनटे चर्चा केली.

PM Modi Sharad Pawar Meet: ईडीचे रेड ते राज ठाकरेंचा 'हिंदूत्ववादी भोंगा'; ते पाच कारणे ज्यासाठी शरद पवार-मोदी भेट अत्यंत महत्त्वाची
शरद पवार-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट (फाईल चित्रं)Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 2:23 PM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi)  यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी तब्बल 25 मिनटे चर्चा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला दिलेला इशारा, त्याला भाजपकडून मिळत असलेलं समर्थन आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पडत असलेल्या तपास यंत्रणांच्या धाडी या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मागच्या काळात पवारांच्या नातेवाईकांवरही ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे या भेटीत पवारांनी मोदींकडे हे विषय काढले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नाही. तसेच राष्ट्रपतीपदाची निवडणूकही होऊ घातली आहे. शिवाय पवारांना यूपीएचे चेअरमनपद देण्याचीही जोरदार मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

संजय राऊतांवर ईडीची रेड

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांनी धाडी मारल्या होत्या. ईडीचं हे धाडसत्रं सुरू असल्याने आघाडीतील अनेक नेते अस्वस्थ असून सूड भावनेने ही कारवाई केली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असल्याचा कयास आहे.

राज ठाकरेंचा हिंदूत्ववादी भोंगा

गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेत राज यांनी मशिदीवरील भोंगे नाही उतरवल्यास हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला होता. राज यांनी हिंदुत्वाचं कार्ड हातात घेतलं आहे. त्याला भाजप नेत्यांकडून समर्थन मिळत आहे. शिवाय राज यांच्या या भूमिकेमुळे राज्यात धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच भाजप आणि मनसेची महापालिका निवडणुकीत युती किंवा अंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे. पवारांच्या मोदी भेटीमागे ही सुद्धा कारणे असल्याचं सांगितलं जात आहे.

पवारांच्या नातलगांवर रेड

काही महिन्यांपूर्वी खुद्द शरद पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी धाडी मारण्यात आल्या होत्या. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशा पवारांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी तीन तीन दिवस बसून होते. एवढेच नव्हे तर पार्थ पवार यांच्या घरीही धाड मारण्यात आली होती. त्याची किनारही या भेटीला असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

पवार-यूपीए चेअरमनपद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात शरद पवार यांना यूपीएचं चेअरमनपद देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पवारांच्या यूपीएच्या चेअरमनपदाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पवार-मोदी भेटीत हा मुद्दाही चर्चिला गेला असावा असं सांगण्यात येतं.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक

येत्या जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. सध्या तरी शरद पवार हे राष्ट्रपती पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगानेही आजच्या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar meets PM Modi: शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; 25 मिनिटे चर्चा; चर्चेचा तपशील गुलदस्त्यात

MNS Vasant More : राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करतायत? राज ठाकरेंचे भोंगे लावायला विरोध ते आज मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट, चर्चा तर होणारच

Maharashtra News Live Update : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली महागाईविरोधात आंदोलन

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.