Sanjay Raut : पक्षपाती कारवाया पाहून पवारांना अस्वस्थ वाटलं असेल, मोदी भेटीनंतर राऊतांकडून पवारांचे आभार
संजय राऊत (Ed Raid on Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, बारा आमदरांच्या नियुक्तीचा मुद्दा आणि लक्षद्वीपच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली. संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? असा सवाल करत मोदींकडे पवारांनी या कारवाईची तक्रार केली.
नवी दिल्ली : आज महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठ्या घाडमोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी दिल्लीत थेट पंतप्रधान मोदींची (Sharad Pawar Pm Modi Meet) भेट घेतली. त्यानंतर राजकारणातला सस्पेन्स आणखी वाढला. मात्र काही वेळातच पवारांनी पत्रकार परिषद घेत हा सस्पेन्स संपवा. संजय राऊत (Ed Raid on Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, बारा आमदरांच्या नियुक्तीचा मुद्दा आणि लक्षद्वीपच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली. संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? असा सवाल करत मोदींकडे पवारांनी या कारवाईची तक्रार केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. मग काही वेळातच संध्याकाळी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांचे आभार मानले आहेत, तसेच या कारवाईवरून त्यांनी भाजपवर (BJP) पुन्हा निशाणा साधला आहे.
पवारांची राजकीय उंची मोठी
मविआ नेत्यांवर दबावासाठी कारवाई सुरू आहे, त्याबाबत पवारांनी याकडे मोदींचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर अशी कारवाई सुरू आहे. आता पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने हे मोदींना सांगणं म्हणजे देशात ज्या ठिकाणी भाजपची सरकारं नाहीत. त्या सर्व विरोधी पक्षांचे हे प्रतिनिधीत्व आहे. शरद पवारांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेत काम केलं आहे. त्यांच्या विचारांची उंची वेगळी आहे, त्यामुळे त्यांनी मोदींवर समोर विचार मांडले, हे अत्यंत महत्वाचे आहे, असेही राऊत म्हणाले. याने काही फरक पडू नाही तर न पडू, आम्ही कशालाही घाबरणार नाही, असेही राऊत म्हणाले. तसेच त्यांनी आयएनएस विक्रांच्या मुद्द्यावरून अनेक आरोप केले आहे.
मला बोलू दिलं जात नाही
शरद पवार मोदींना का भेटले याची जास्त माहिती माझ्याकडे, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत. तसेच माझ्यासरख्या माणसाला संसदेत बोलू देत नाहीत. बोलल्यावर आम्ही कारवाईला सामोरे जातोय, मात्र आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. आम्ही लढणारी लोकं आहोत. पवारांनी पन्नास वर्षे राजकारण पाहिलं आहे. त्यांना या कारवाई बघून अस्वस्थ वाटले असेल त्यामुळे पवारांचं मोदींशी बोलनं सर्वांसाठी महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊतांनी दिली, तसेच मला माझ्या पक्षातील सर्वांचा पाठिंबा आहे, उद्धव ठाकरे सतत माझ्या संपर्कात आहेत. प्रियंका गांधी यांचाही मला फोन आला होता. अनेक नेत्यांचा मला पाठिंबा मिळतोय, तसेच आमच्यात घाबरण्यास मनाई आहे आणि मी लढणारा माणूस आहे, असेही राऊत म्हणाले.
अनिल देशमुखांची 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडीत रवानगी, चौकशी दिल्ली की मुंबईतच होणार?
TOP 9 Headlines | 6 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या