गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा

काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह आज चार खासदार राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. (sharad pawar praises Ghulam Nabi Azad in rajya sabha)

गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:28 AM

नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह आज चार खासदार राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेतानाच त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवारांनीही या आठवणींना उजाळा देताना आझाद यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यात आपण कसे अपयशी झालो याचा किस्साही ऐकवला. (sharad pawar praises Ghulam Nabi Azad in rajya sabha)

शरद पवार यांनी राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांना पाडण्यासाठी कसा प्रयत्न केला याचा किस्साही ऐकवला. ते म्हणाले की, 1982 च्या निवडणुकीची ही गोष्ट आहे. गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात. पण ते महाराष्ट्रातील वाशिम सारख्या दुर्गम भागातून निवडणुकीला उभे राहिले. खरे तर वाशिम सारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नसायचे. त्याकाळात आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. आम्ही ठरवलं, आझाद यांना निवडून द्यायचं नाही. त्यांना पाडायचं. आम्ही खूप प्रयत्न केला. आझाद यांच्या विरोधात प्रचाारचं रान उठवलं. पण तरीही आझाद निवडून आले. त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांचं आणि वाशिमकरांचं अतूट नातं निर्माण झालं.

देशहिताला महत्त्व देणारा नेता

गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभा, लोकसभेतही खासदार म्हणून काम पाहिलं. त्यांनी मंत्री म्हणून अनेक खात्याचा कारभार पाहिला. जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जाते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. संसदीय आणि राजकीय अनुभव असलेले आझाद हे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी देशहितासाठी नेहमीच महत्त्व दिलं आहे. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. आज काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे. अशा वातावरणात आझाद यांची गरज असताना ते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांची आजही गरज आहे. त्यांची जागा घेणं कठीण आहे. उद्या काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यास ते परत संसदेत येतील अशी आशा आहे, असंही पवार म्हणाले.

मोदींकडूनही गौरव

राज्यसभेतील गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला. या सर्व जणांनी राज्यसभेचा गौरव वाढवण्याचं काम केले. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान याचा देशाला फायदा झाला. या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आभारी आहे, असं मोदी म्हणाले. गुलाम नबी आझाद ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मी देखील एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी आमच्यामध्ये जवळचे संबंध होते. ज्यावेळी गुजरातच्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये 8 लोक मारले गेले. त्यावेळी पहिल्यांदा गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. तेव्हा ते अश्रू रोखू शकले नव्हते. त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुजरातच्या लोकांसाठी केलेले प्रयत्न विसरू शकत नाही. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडकल्यासारखं काम केले, असं सांगताना मोदी भावूक झाले होते. (sharad pawar praises Ghulam Nabi Azad in rajya sabha)

संबंधित बातम्या:

शरद पवारांच्या वाढदिवसाला केकसाठी तुफान राडा, पोलिसांचा लाठीमार

नरेंद्र मोदी राज्यसभेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आठवणीनं भावूक

याला चिंधी विचार म्हणतात साहेब, निलेश राणेंचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल

(sharad pawar praises Ghulam Nabi Azad in rajya sabha)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.