AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

President Election 2022:राष्ट्रपती निवडणुकीत आता विरोधकांचं नेतृत्व शरद पवारांकडे?, ममता बॅनर्जी साईडलाईन, आता ‘यांच्या’ नावाची उमेदवारीसाठी चर्चा

या निवडणुकीत नेतृत्व करुन, 2024 च्या निवडणुकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा होण्याची ही ममतांची खेळी असल्याचे मानण्यात येत होते. काँग्रेसलाही ममता यांचे हे नेतृत्व अमान्य़ होते. त्यामुळे शरद पवारांनी खेळी करत, विरोधकांची वेगळी बैठक बोलावण्याची घोषणा केल्याचे मानले जात आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात य़ेत आहे.

President Election 2022:राष्ट्रपती निवडणुकीत आता विरोधकांचं नेतृत्व शरद पवारांकडे?, ममता बॅनर्जी साईडलाईन, आता 'यांच्या' नावाची उमेदवारीसाठी चर्चा
Sharad Pawar lead oppositionImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 2:07 PM
Share

नवी दिल्ली – राज्यात विधानपरिषदेसाठी तीव्र सत्तासंघर्ष असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांचे मन मात्र देशाच्या राजकारणात असल्याचे दिसते आहे. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शरद पवार राज्यातील जबाबदारी अजित पवारांकडे सोपवून दिल्लीला रवाना झाले आहेत. विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार (President Election)ठरवण्यासाठी शरद पवारांनी उद्या मंगळवारी 21 तारखेला दिल्लीत एनेक्स बिल्डिंगमध्ये विरोधकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत 17 पक्षांचे नेते सामील होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. यापूर्वी 15 जून रोजी विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamta Banarjee))यांच्या नेतृत्वात बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीत शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना उमेदवारीचा आग्रह करण्यात आला होता. मात्र या दोघांनीही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. विशेष म्हणजे उद्याच्या होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत.

ममता बॅनर्जींना केले हद्दपार

विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा एकच उमेदवार असावा यासाठी विरोधकांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरुवातीला पुढकार घेतला होता. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामार्फ विरोधकांच्या गाठीभेटीही सुरु करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनीही विरोधकांची एकत्रित बैठक 15 जून रोजी बोलावली. या बैठकीला काँग्रेससह 22 पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र आम आदमी पार्टी, बिजू जनता दल, शिरोमणी अकाली दल, नितीश कुमार यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. या निवडणुकीत नेतृत्व करुन, 2024 च्या निवडणुकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा होण्याची ही ममतांची खेळी असल्याचे मानण्यात येत होते. काँग्रेसलाही ममता यांचे हे नेतृत्व अमान्य़ होते. त्यामुळे शरद पवारांनी खेळी करत, विरोधकांची वेगळी बैठक बोलावण्याची घोषणा केल्याचे मानले जात आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात य़ेत आहे. त्यांच्याऐवजी तृणमूलचे महासचिव अभिषेक बॅनर्जी हे या बैठकीत सहभागी होतील. विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला तृणमूलचा पाठिंबा असेल असेही ममतांनी आधीच जाहीर केलेले आहे.

भाजपाचेही प्रयत्न सुरु

दुसरीकडे भाजपाची राष्ट्रपतीपदाची जोरदार तयारी सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीही भाजपा प्रयतन करीत आहे. राजनाथ सिंह यासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करीत आहेत. मात्र या चर्चेत उमेदवाराच्या नावाची विचारणा होते, आहे, भाजपाने अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. तसेच निवडणूक बिनविरोध करायची असेल तर विरोधकांच्या उमेदवाराच्या नावाला भाजपाने पसंती द्यावी, असाही एक मतप्रवाह आहे.

विरोधकांची एकी का नाही

2024 च्या लोकसभा निवडणुका सगळ्याच विरोधी पक्षांच्या डोळ्यासमोर आहेत. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांचा एक चेहरा उतरवायचा असल्यास प्रत्येकजण ही संधी मिळाली यासाठी उत्सुक आहे. त्यामुळेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे श्रेय कुणा एका व्यक्तीकडे जाऊ नये, ही सगळ्या महत्त्वाकांक्षी नेत्यांची इच्छा दिसते आहे. यात शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी अशा अनेक नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

आता मुलायमसिंह यादव यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज 30 जूनच्या आत भरावा लागणार आहे. विरोधकांकडून अद्याप नावाची निश्चिती झालेली नाही. शरद पवार आणि फारुख अब्दुला यांनी नकार दिल्यानंतर आता महात्मा गांधींजीचे नातू गोपान कृष्ण गांधी यांचे नाव आघाडीवर आहे. ते आय़एएस अधिकारी होते आणि प. बंगालचे राज्यपालही राहिलेले आहेत. त्यातच आता समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या नावाची चर्चाही सुरु झाली आहे. ममता बॅनर्जी यांनीही मुलायमसिंह यादव यांचे नाव सुचवले होते, असे सांगण्यात येते आहे.

पवारांची खेळी काय

शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात सर्वच पक्षातील मित्र आहेत, त्यांचा राजकारणातील अनुभवही मोठा आहे. प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती झाल्या, त्यात शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचाही अनुभव त्यांच्याकडे आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षातही शरद पवार हे संवादाने मार्ग काढू शकतात. अशा स्थितीत पवारांच्या मध्यस्थीने एखादे नाव नक्की करण्यात होण्याची जास्त संधी आहे. तसेच या निमित्ताने 2024 च्या पंतप्रधानपदासाठी होणाऱ्या आघाडीची रंगीत तालीम आणि त्या आघाडीचं नेतृत्व करण्याची संधीही पवारांना आहे. त्यामुळेच पवार यात आग्रही असल्याचे दिसून येते आहे.

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.