वक्फ सुधारणा विधेयकावर शरद पवार यांच्या पक्षाचे मोठे विधान, सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा देश कोणाच्या मनाने…’
संसदेत बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक २०२५ सादर केले जात आहे. या विधेयकांवर राष्ट्रवादी काँग्रेस काय स्टँट घेणार याकडे सर्वांच्या नजारा लागल्या असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे.

संसदेत ‘वक्फ सुधारणा विधेयक २०२५’ सादर केले जाणार आहे. बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली आहे. लोकसभेत हे विधेयक सादर झाल्यानंतर येत्या 4 एप्रिल पर्यंत संसदेत यावर चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंचे सदस्य यावर आपली मते मांडणार आहेत. आता या विधेयकासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य समोर आले आहे.
संसदेत आज बहुचर्चित ‘वक्फ सुधारणा विधेयक २०२५’ सादर केले जात आहे. या विधेयकास मंजूर होण्यासाठी संसदेत सादर केले जात असताना या विधेयकास राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादीचा नेहमीच सस्पेन्स कायम राहीला आहे. या संदर्भात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी सांगितले की ही रणनीतीचा नव्हे तर अधिकारांचा प्रश्न आहे. एक सशक्त लोकशाहीत कोणाच्या मर्जीने देश चालू शकत नाही. हा देश आपल्या संविधानानुसार चालतो.




येथे पोस्ट पाहा –
VIDEO | Parliament Session: On Waqf (Amendment) Bill, NCP (SP) MP Supriya Sule (@supriya_sule) says, “In a strong democracy, the country is run by the Constitution. We will participate in the discussion tomorrow… We had a good discussion. Tomorrow, we will participate in the… pic.twitter.com/nzxhPJxEPu
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2025
इंडिया अलायन्समध्ये चांगली चर्चा – सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की …त्यामुळे आम्ही या चर्चेत सहभागी असणार आहे. आम्ही त्यांची बाजू ऐकू आणि आपले म्हणणे ही लोकसभेत मांडू. जे संविधानाच्या बाजूचे असतील आम्ही त्यांच्या बाजूने असणार आहोत. इंडिया अलायन्सने यावर चांगली चर्चा केली होती. आता सभागृहात आपली बाजू मांडणार’
उद्धव ठाकरे यांची काय भूमिका?
आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिका काय असणार आहे हे समोर आलेले नाही. सीएम देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत लिहीलेय की उद्धव ठाकरे यांचा पक्ष हिंदूत्ववादी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालतो की राहुल गांधी यांच्या पावलांवर चालून लांगुनचालन करत राहणार आहे…त्यामुळे संसदेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार या विधेयकाच्या बाजूने बोलणार की विरोधात हे स्पष्ट झालेले नाही.