12 वर्ष तिनं सगळं सहन केलं. पण, स्वप्नातही आलं नसेल असं त्याने केलं, थेट जुगारात…

नशा केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. दारू पिल्यानंतर त्याच्यातली असुरी शक्ती जागी होते. बायकोसोबत गैरवर्तन करणं, तिला मारणं हे त्यांचं नेहमीचंच झालं होते. तिच्या आईच्या घराची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी तो सतत मारहाण करायचा.

12 वर्ष तिनं सगळं सहन केलं. पण, स्वप्नातही आलं नसेल असं त्याने केलं, थेट जुगारात...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 8:22 PM

मेरठ : त्यांचं आणि तिचं 12 वर्षांपूर्वी अहमदनगर येथे लग्न झाले. पतीला दारूचं व्यसन असल्याचं तिला कळलं तेव्हा तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. लग्नाआधीपासूनच त्याला दारूचे व्यसन. तो नशा केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. दारू पिल्यानंतर त्याच्यातली असुरी शक्ती जागी होते. बायकोसोबत गैरवर्तन करणं, तिला मारणं हे त्यांचं नेहमीचंच झालं होते. तिच्या आईच्या घराची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी तो सतत मारहाण करायचा. कुटुंबाच्या हितासाठी ती सर्व काही सहन करत होती. पण, त्याने असं काम केलं की ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ही धक्कादायक घटना आहे. मेरठ पोलीस स्टेशनच्या लिसाडी गेट भागात ही घटना घडलीय. या पोलीस स्थानकात एका पीडित महिलेने पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी धाव घेतली. पीडित महिलेने पोलिसांना आपल्यावरची आपबिती सांगितली तेव्हा तेही या घटनेमुळे संभ्रमात पडले.

हे सुद्धा वाचा

पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत पीडिता म्हणाली, माझा नवरा अचानक मला त्याच्या मित्रासोबत त्याच्या घरी जायला सांगू लागला. यामागचे कारण विचारले असता त्याने जे उत्तर दिले ते धक्कादायक आहे.

पती त्याच्यामित्रासोबत जुगार खेळत होता. जुगार खेळताना तो हरला. अखेरचा डाव म्हणून त्याने पैज लावली. या पैजेत त्याने बायकोला लावले. तो पैज हरला. मी आता ती पैज गमावली आहे त्यामुळे तुला मित्रासोबत राहावे लागेल असे तो सांगत आहे असे पीडिता म्हणाली.

पत्नीला पैजेत हरवल्यानंतर आरोपी आता तिला विजयी मित्राच्या घरी जाण्यास भाग पडत आहे. आतापासून तो तुझा मालक आहे. त्यामुळे तू तिथे जाऊन रहा असं आरोपी म्हणत आहे. असे सांगत तिने पतीच्या अत्याचाराला वाचा फोडली.

माझा पती जबरदस्ती करत असल्यामुळे भीतीपोटी मी काही दिवस घरापासून लांब गेले. पण, परत आल्यावर त्याने माझा तुझ्याशी काही संबंध नाही. मी तुला जुगारात हरवले आहे असेच सारखा सांगत आहे. गेली १२ वर्ष मी त्याचे व्यसन माहित असतानाही कुटुंबासाठी त्याच्यासोबत राहिले. पण, आता त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याला शिक्षा मिळायलाच हवी अशी मागणी त्या पीडित महिलेने पोलसांकडे केलीय.

महाभारताची आठवण करून देणारी ही घटना आहे. पांडवांनी त्यांची पत्नी द्रौपदी हिला जुगारात पणाला लावले होते. त्या जुगारात कौरव जिंकले होते. असाच काहीसा प्रकार त्या पीडित महिलेसोबत घडलाय. यावर आता पोलीस काय कारवाई करतात याची उत्सुकता आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.