ट्रम्प यांना शुभेच्छा देणाऱ्या शेख हसीना अजूनही बांगलादेशच्या पंतप्रधान? भारताची भूमिका काय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या सध्या भारतात आहेत. ५ ऑगस्ट रोजी त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता. कारण बांगलादेशात आंदोलन हिंसक झालं होतं. लोकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता. ज्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. पण आता शेख हसीना यांनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

ट्रम्प यांना शुभेच्छा देणाऱ्या शेख हसीना अजूनही बांगलादेशच्या पंतप्रधान? भारताची भूमिका काय
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 5:28 PM

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि देशातील सर्वात मोठा पक्ष अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर शेख हसीना यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पण यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी स्वतःला बांगलादेशच्या पंतप्रधान म्हटले आहे. त्यामुळे बांगलादेशात एकच खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या अवामी लीगच्या कार्यालयीन सचिवाने स्वाक्षरी केलेल्या पत्रात, हसिना यांनी ट्रम्प यांच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा केली आणि ‘बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील’ अशी आशा व्यक्त केली.

पत्रात म्हटले आहे की, ‘बांगलादेश अवामी लीगच्या अध्यक्षा (पंतप्रधान) शेख हसीना यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. शेख हसीना यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांची भेट घेतली होती तेव्हाची आठवण देखील झाली. ‘दोन्ही देशांच्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी त्यांनी पुन्हा एकत्र काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.’

बांगलादेशात काही दिवसांपूर्वी सरकारविरोधी आंदोलन झालं ज्यामध्ये शेख हसीना यांना ५ ऑगस्टला देश सोडून भारतात यावे लागले. पंतप्रधानांच्या निवासस्थानावर लोकांनी हल्ला करुन वस्तू देखील चोरुन नेल्या होत्या. आता शेख हसीना या सध्या भारतातच आहेत. एका गुप्त ठिकाणी त्यांची भारत सरकारने व्यवस्था केली आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी बांगलादेश मोठे आंदोलन झाले. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन अनेक दिवस सुरु होते. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

लष्करप्रमुख काय म्हणाले होते?

बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी त्याच दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. 5 ऑगस्टच्या संध्याकाळी त्या बांगलादेश लष्कराच्या विमानातून दिल्लीजवळ भारतीय हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर उतरल्या. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत माहिती देताना सांगितले होते की, शेख हसीना यांना अल्प कालावधीत भारत भेटीची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच प्रोटोकॉलनुसार त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

शेख हसीना यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान म्हणून अभिनंदन केल्यानंतर आता हाच प्रश्न भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आला. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत शेख हसीना यांना माजी पंतप्रधान मानतो आणि त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हसीना यांचा अमेरिकेवर आरोप

शेख हसीना यांनी बांगलादेशातून त्यांच्याविरोधात सुरु झालेल्या आंदोलनामागे अमेरिकेचा हात असल्याचे म्हटले होते. जो बायडेन प्रशासनावर त्यांनी आरोप केला होता. त्यांचा मुलगा सजीद वाजेद यांनी हा अहवाल फेटाळून लावला. त्या पंतप्रधान असतानाही शेख हसीना यांनी अमेरिकेवर सत्तापालट केल्याचा आरोप केला होता. नाव न घेता त्या म्हणाल्या होत्या की, एका देशाने त्यांना सांगितले होते की, सेंट मार्टिन बेट दिले तरच ते बांगलादेशमध्ये सत्तेत राहू देतील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.