Kargil War : कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरीची सर्वप्रथम माहिती देणाऱ्या मेंढपाळाबद्दल वाईट बातमी

Kargil War : कारगिल युद्धाला आता 25 वर्ष झाली आहेत. भारतीय सैन्याने कारगिल युद्धात आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला. या कारगिल युद्धा एका मेंढपाळाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या मेंढपाळाबाबत एक वाईट बातमी आहे.

Kargil War : कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरीची सर्वप्रथम माहिती देणाऱ्या मेंढपाळाबद्दल वाईट बातमी
tashi namgyal passed away
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 1:47 PM

कारगिल युद्धाकडे भारतीय सैन्याचा सर्वोच्च पराक्रम म्हणून पाहिलं जातं. हजारो फूट उंचीवर दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी आपली ताकद दाखवून दिली होती. भारतीय सैन्याने सर्वोच्च पराक्रम, शौर्य कारगिल युद्धात दाखवलं. या युद्धाला ‘ऑपरेशन विजय’ नाव देण्यात आलं होतं. ही लढाई अजिबात सोपी नव्हती. कारण आपल्याला खालून वर जायचं होतं आणि पाकिस्तानी सैनिक पूर्ण तयारीनिशी आधीपासून तिथे तैनात होते. त्यांच्याकडून ती ठिकाण मिळवताना भारतीय सैन्याने आपलं शौर्य दाखवलं. या कारगिल युद्धाला 25 वर्ष झाली आहेत. या कारगिल युद्धात एका भारतीय मेंढपाळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्यामुळेच भारतीय सैन्याला सर्वप्रथम पाकिस्तानच्या कारस्थानाचा सुगावा लागला. त्यानंतर एका मोठ्या युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी केंद्रात तत्कालिन अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं.

लडाखी मेंढपाळ ताशी नामग्याल यांनी सर्वप्रथम भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल अलर्ट केलं होतं. त्यानंतर भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन विजय’ची सुरुवात झाली. भारतीय सैन्याला सर्वप्रथम पाकिस्तानी घुसखोरीची माहिती देणाऱ्या ताशी नामग्याल यांचा शनिवारी मृत्यू झाला. लडाखच्या आर्यन व्हॅलीमध्ये त्यांचं निधन झालं. रविवारी ताशी नामग्याल यांना सैन्याने पूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला.

‘फायर एंड फ्यूरी कोर’ ने काय म्हटलय?

“ताशी नामग्याल यांनी निस्वार्थी भावनेने जे केलं ते नेहमी लक्षात ठेवलं जाईल. त्यांनी देशासाठी जे योगदान दिलं, त्यासाठी भारतीय सैन्य सदैव त्यांचं आभारी राहील. एका देशभक्ताच निधन झालय. लडाखचा वीर-तुमच्या आत्म्याला शांती मिळो. दु:खाच्या या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत” असं ‘फायर एंड फ्यूरी कोर’ ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एका मेंढीमुळे पाकिस्तानच कास्थान समजलं

मे 1999 च्या सुरुवातीला ताशी नामग्याल यांना त्यांची मेंढी सापडत नव्हती. त्या मेंढीचा शोध घेत असताना त्यांना बटालिकच्या पर्वत रांगांमध्ये पाकिस्तानी सैनिक पठानी पोषाखात बंकर खोदताना दिसले. त्यांनी स्थितीच गांभीर्य लक्षात घेत लगेच भारतीय सैन्याला याची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारवाई सुरु झाली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.