पंजाब सरकार खासगी रुग्णालयांना वाढीव किमतीला लसी विकतंय, शिरोमणी अकाली दलाचा मोठा आरोप

पंजाब सरकार 400 रुपयांची लस 1060 रुपयांना खासगी रुग्णालयांना विकतंय, असा आरोप शिरोमणी अकाली दलानं केला आहे. Shiromani Akali Dal Sukhbir Singh Badal

पंजाब सरकार खासगी रुग्णालयांना वाढीव किमतीला लसी विकतंय, शिरोमणी अकाली दलाचा मोठा आरोप
सुखबीर सिंह बादल
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 1:41 PM

नवी दिल्ली: शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी गुरुवारी पंजाबमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. बादल यांनी काँग्रेस सरकारवर कोरोना लसी खासगी रुग्णालयांना वाढीव किमतीमध्ये विकल्याचा आरोप केला. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस 1060 रुपयांना खासगी रुग्णालयांना विकण्यात येत असल्याचं म्हटलं.(Shiromani Akali Dal leader Sukhbir Singh Badal accuses Punjab Government sold corona vaccine with high rates to private hospital)

पंजाबमध्ये लसींचा तुटवडा नाही

सुखबीर सिंह बादल यांनी पंजाब सरकारपंवर आणखी एक आरोप केला पंजाब मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा नाही. खासगी रुग्णालयांना कोरोना लसी वाढीव किमतीला विकल्या जात आहेत. पंजाब सरकार कोरोना लस 400 रुपयांना विकत घेत असून 1060 रुपयांना विकत आहे.

खासगी रुग्णालयात लसीसाठी 1560 रुपयांचं शुल्क

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी राज्यातील खासगी रुग्णालयात 1560 रुपयांना कोरोना लस दिली जात असल्याचं म्हटलं. पंजाब राज्यातील मोहाली येथे एका दिवसात खासगी रुग्णालयांना लसीचे 35000 डोस विकल्याचा आरोप बादल यानी केला.

आम आदमी पार्टी शांत का?

शिरोमणी अकाली दलानं यावेळी कोरोना लसींविषयी पंजाब सरकारच्या धोरणावर आम आदमी पार्टी शांत का आहे? असा सवाल केला. पंजाब सरकारंनं लस मोफत द्यावी, सरकारला हे जमणार नसेल तर आम्ही हायकोर्टात जाऊ, असं बादल म्हणाले आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटली

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 887 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 32 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 713 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 7 हजार 71 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित बातम्या:

लस प्रभावी आहे हे कसं समजतं? भारतासाठी कोणती लस चांगली?

‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!

(Shiromani Akali Dal leader Sukhbir Singh Badal accuses Punjab Government sold corona vaccine with high rates to private hospital)

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.