केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही; संजय राऊतांचा घणाघात

पेगासस प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससवर चर्चा व्हावी. (shiv sena leader sanjay raut attacks bjp over pegasus issue)

केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही; संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 10:35 AM

नवी दिल्ली: पेगासस प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससवर चर्चा व्हावी. या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. पण सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला. (shiv sena leader sanjay raut attacks bjp over pegasus issue)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना पेगासस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. विद्यमान सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही. हे तुम्हाला सरकार सतेत आल्यापासून जाणवत असेल. संसद चालवणं ही सरकारची जबाबदारी असते. पण त्यांची ही इच्छा दिसत नाही. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे. चर्चेवेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उपस्थित राहावे. त्यानंतर न्यायालयीन चौकशी नेमायची का किंवा जेपीसी नेमायची का हा नंतरचा विषय आहे, असं राऊत म्हणाले.

सरकार पळ का काढत आहे?

पेगाससचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांनी तिथे असण्याने त्याने फरक पडत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ते ऐकलं पाहिजे. सरकार त्यापासून का पळ काढत आहे? इतक्या गंभीर विषयावर देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेला तीन तास देऊ शकत नाही का? आम्ही फक्त तीन तास मागत आहोत. देशासाठी. आणि सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

सरकारच संसद ठप्प करतंय

सरकारला संसद चालू द्यायची नाही. सरकार विरोधी पक्षावर ठपका ठेवत आहे. पण सरकारलाच गोंधळ निर्माण करायचा आहे. सरकारला पेगाससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. विरोधी पक्षाकडून त्यांना जे ऐकावं लागेल त्याबाबत त्यांच्या मनात धास्ती आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्य ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे. पेगासस असेल, कृषी कायदे असेल… विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचं ऐकणं लोकशाहीत प्रत्येक सरकारला बंधनकारक जरी असलं तरी केंद्रातलं सरकार त्या संदर्भात सतत माघार घेताना दिसतंय. सरकार या गोंधळास प्रवृत्त करतंय. हा गोंधळ असाच राहावा आणि संसद ठप्प राहावी ही सरकारची इच्छा दिसते. त्याचं कुणी समर्थन करू नये, असं सांगतानाच अनेक प्रकारची विधेयकं कोणतीही चर्चा न करता पास केली जात आहेत. सरकारला हेच हवं आहे. त्यामुळे सरकार पेगाससवर चर्चा करत नाही, असा आरोप त्यांनी केला.

तृणमूल आमच्यासोबतच

काल विरोधकांची बैठक झाली. यावेळी तृणमूलचे खासदार उपस्थित नव्हते. त्याबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संसदेत गोंधळ घालण्यात काँग्रेसच्या बरोबर तृणमूलचे खासदार होते. त्याचवेळी तृणमूलची बैठक होती. ते तिकडे गेले असतील. प्रत्येक बैठकीला तृणमूलचे नेते असतात. काल सकाळी होते आजही आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भुवया का उंचावता

ममता बॅनर्जी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याशी संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नुसती भेट घेतली की भेट झाली यावर नाती टिकत नसतात. त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आहेत. भेटीगाठी होत राहतात. अजून दोन दिवस आहेत त्या दिल्लीत. त्या गडकरींना भेटल्यातर तुम्हाला त्याची चिंता का? असा सवाल करतानाच राज्याच्या मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत येतात. तेव्हा आपल्या राज्यातील अनेक विकास कामांची जंत्री घेऊन येतात. गडकरींकडे महामार्ग रस्ते, पायाभूत सुविधा हे खातं आहे. बंगालमधील अशा कामासाठी त्या गडकरींना भेटत असतील तर मीडिया आणि राजकारण्यांना भुवया उंचावण्याचं काही कारण नाही, असं ते म्हणाले. ममता दीदी उद्धव ठाकरेंना भेटणार का मला माहीत नाही. पण जेव्हा ममतादीदी मुंबईत येतात तेव्हा त्या उद्धव ठाकरेंना भेटतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संकटातूनच चेहरे निर्माण होतात

सर्वांनी एकत्र यावं, अशी ममतादीदींची इच्छा आहे. त्यांचं विधान ऐकलं. आधी एकत्र येऊ. काम करू. नेता आणि चेहरा नंतर ठरवू, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या कामात त्यांना यश मिळो ही आमची सदिच्छा आहे, असं सांगतानाच नेता आणि चेहरा ठरवणं कठिण आहे हा तुमचा गैरसमज आहे. योग्य वेळ येताच एकमत होतं. गरजेतून आणि संकटातून असे चेहरे आणि नेतृत्व निर्माण होत असतं, असंही त्यांनी सांगितलं. (shiv sena leader sanjay raut attacks bjp over pegasus issue)

संबंधित बातम्या:

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणतात, अभिमान असेल, पण…

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे एकत्र चिपळूण दौऱ्यावर

(shiv sena leader sanjay raut attacks bjp over pegasus issue)

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.