फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा; राऊतांची मागणी

परदेशी कंपन्या आणि अॅपकडून काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on phone tapping of journalist and editor)

फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा; राऊतांची मागणी
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 10:30 AM

नवी दिल्ली: परदेशी कंपन्या आणि अॅपकडून काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: त्यावर खुलासा केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (shiv sena leader sanjay raut reaction on phone tapping of journalist and editor)

देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा 1500 हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग झाल्याची काही नावं समोर आली आहेत. अजून बरीचशी नावं समोर यायची आहे. यावेळी पत्रकारांचे सर्वाधिक फोन टॅप झाले. संपादकांचेही फोन टॅप झाले. हे गंभीर आहे. गेल्या काही वर्षापासून पत्रकार, राजकारणी या देशात भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन टॅप केले जातात. ही सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे. काही परदेशी कंपन्या, परदेशी अॅप अशा प्रकारे या देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशातील स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका आहे, असं राऊत म्हणाले.

देशात भीतीचं वातावरण

या देशाचं शासन आणि प्रशासन कमजोर आणि दुबळं असल्याचं हे लक्षण आहे. कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे सायबर क्राईम संदर्भात कठोर नियम नाही, कायदे नाहीत. सरकारला ज्या पद्धतीने समोर येऊन या सर्व गोष्टींचा मुकाबला करायला हवा. ते दिसत नाही. त्यामुळे देशात सर्वच क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे, अशी टीका त्यांनी केली. याबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आम्ही हा प्रश्न संसदेत लावून धरणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचे फोन टॅप केले तर आश्चर्य वाटणार नाही

महाराष्ट्रात सरकार बनत असताना त्याआधी फोन टॅपिंग करण्यात आली होती. फोन टॅप करणारे आमचेच म्हणजे महाराष्ट्रातील होते. त्याची चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे प्रकरण विधानसभेत मांडलं. त्यावर चौकशी लावली. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी या फोन टॅपिंगमध्ये होते, त्याची चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे फोन टॅप कोणी करत असेल तर आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (shiv sena leader sanjay raut reaction on phone tapping of journalist and editor)

संबंधित बातम्या:

भागवत कराड आणि देवेंद्र फडणवीस भेटीत काय घडलं?, हास्यविनोद ते गंभीर चर्चा; ‘हे’ चार फोटो काय सांगतात?

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

आम्ही दिवा स्वप्न पाहात नाही, पण 2024ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला

(shiv sena leader sanjay raut reaction on phone tapping of journalist and editor)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.