Video| शिवराज सिंह चौहान थिरकले ढोलच्या तालावर; आदिवासी बांधवांसोबत नृत्य
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंडलामध्ये आदिवासी बांधवांसोबत ढोलवर नृत्य केल्याचे पहायला मिळाले. मंडलामध्ये आदिवासी गौरव दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शिवराज सिंह चौहान देखील सहभागी झाले.
भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंडलामध्ये आदिवासी बांधवांसोबत ढोलवर नृत्य केल्याचे पहायला मिळाले. मंडलामध्ये आदिवासी गौरव दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शिवराज सिंह चौहान देखील सहभागी झाले, एवढेच नाही तर त्यांनी ढोलच्या तालावर ठेका देखील धरला. व्हिडीओमध्ये आपन पाहू शकता की, या कायक्रमामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले असून, ते आपल्या पारंपरीक पोशाखामध्ये नृत्य करत आहेत, तर त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री चौहान यांनी देखील ढोल वाजवत नृत्य केले आहे.
मोहाच्या दारूला अधिकृत परवानगी
या कार्यक्रमादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता दारूच्या दुकांनावर मोहापासून बनवण्यात आलेली दारू देखील विकता येणार आहे. सरकारने या दारूला अधिकृत परवानगी दिली आहे. मोहाच्या फुलापासून बनवण्यात आलेली दारू हेरिटेज दारूच्या नावाने दुकांवर विकता येईल. चौहान म्हणाले की, मोहाची फुले गोळा करणे आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तुंची निर्मिती करणे, हा आदिवासी लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. यामधून मिळणाऱ्या पैशांमधून त्यांचे घर चालते. त्यांची आर्थिक प्राप्ती वाढावी, नवे आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मोहाच्या दारूला अधिकृत परवानगी दिली आहे.
आदिवासी गौरव सप्ताहाची घोषणा
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दर 15 नोव्हेंबरला संपूर्ण देशात आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सप्ताहामध्ये देशातील वेगवेगळ्या भागात आदिवाशी परंपरेशी सबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सुरुवात भोपाळमधून झाल्याचेही चौहान म्हणाले.
#WATCH | Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan plays dhol, dances with the people from a tribal community, in Mandla (22.11) pic.twitter.com/kDuVOUDISg
— ANI (@ANI) November 22, 2021
संबंधित बातम्या
ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!