…नाहीतर जमिनीत 10 फूट गाडू : शिवराज सिंह चौहान
"आजकाल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्याला सोडणार नाही", असं शिवराज सिंह म्हणाले (Shivraj Singh Chouhan warns mafias to leave Madhya Pradesh)
भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राज्यात गुंडगिरी, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या माफियांना इशारा दिला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारीची घटना घडली तर आरोपीला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राज्याबाहेर निघून जाण्यास सांगितलं आहे. शिवराज सिंह आज (25 डिसेंबर) होशंगबाद येथे शेतकरी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते (Shivraj Singh Chouhan warns mafias to leave Madhya Pradesh).
“आजकल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्याला सोडणार नाही. मामा सध्या फॉर्ममध्ये आहे. माफियांविरोधात अभियान सुरु आहे. ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा वापर करुन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवला, ड्रग्ज माफिया, त्यांना सांगतोय, अरे ऐका रे, मध्यप्रदेश सोडा, अन्यथा जमिनीच्या 10 फूट खाली गाडेन आणि त्याचा कुणाला पत्ताही लागणार नाही”, असा घणाघात शिवराज सिंह यांनी केला.
शिवराज सिंह नेमकं काय म्हणाले पाहा व्हिडीओत :
आज कल अपन खतरनाक मूड में है गड़बड़ करने वाले को छोड़एंगे नहीं, मामा फार्म में है @ChouhanShivraj माफिया को चेतावनी मध्यप्रदेश छोड़ दो नहीं तो जमीन मे गाड़ दूंगा पता भी नहीं चलेगा @ndtv @ndtvindia pic.twitter.com/lunC9ufrvx
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) December 25, 2020
दहा दिवसांपूर्वी शिवराज सिंह यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत अशाचप्रकारचं काहीसं विधान केलं होतं. त्यावेळी ते जबलपूर येथे बोलत होते. “कमलनाथजी ऐकून घ्या. माझी जनताच माझी देवता आहे. माफियांना चांगलीच अद्दल घडवेल. ड्रग्ज, जमीन माफिया आणि गुंडांना फोडून काढेल. मला कुणीच थांबवू शकत नाही”, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज पु्न्हा त्यांनी अशाप्रकारचं विधान केलं आहे (Shivraj Singh Chouhan warns mafias to leave Madhya Pradesh).
हेही वाचा : सायकलवरुन पंढरपूरवारी, 24 जणांचं गावात जंगी स्वागत, तब्बल 180 जणांना कोरोना