New delhi : 12 खासदारांच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक, उद्या कामकाजावर बहिष्कार, राऊतांची माहिती

| Updated on: Dec 07, 2021 | 5:51 PM

12 खासदाराच्या निलंबनावरून आक्रमक होत उद्या विरोधक राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

New delhi : 12 खासदारांच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक, उद्या कामकाजावर बहिष्कार, राऊतांची माहिती
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसदेत हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचं पहायला मिळालं होतं, त्यानंतर या अधिवेशनाच्या सुरूवातीलच गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यात शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश होता. काँग्रेसच्या 6 खासदारांचा समावेश होता. तर 2 खासदार तृणमूल काँग्रेसचे होते. शिवसनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे.

उद्या राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार

12 खासदाराच्या निलंबनावरून आक्रमक होत उद्या विरोधक राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अधिवेशनाचं कामकााज सुरू होण्याआधी भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. तर दुसरीकडे सदनातला गदारोळ सुरूच आहे. 12 सदस्यांचं निलंबन झाल्यानं समान विचारधारेचे विरोधी पक्ष एकत्र येत राज्यसभेच्या उद्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.

राहुल गांधींचा अधिवेशनात आक्रमक पवित्रा

तर दुसरीकडे अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या परिवारांना मदत देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी केली. तर दुसरीकडे भाजपच्या सर्व खासदारांनी अधिवेशनात उपस्थिती लावावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या.

उद्याही संसदेत गदारोळ होण्याची शक्यता

उद्याही संसदेत विविध मुद्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण 12 सदस्यांच्या निलंबनावरून शिवसेनेसह इतरही विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आज 12 सदस्यांच्या निलंबनावरून काही काळ राज्यसभेचं कामकाजही स्थगित झाल्याचं पहायला मिळालं.

महामेट्रोचे लाकडी पुलावर रखडले काम लवकरच सुरु होणार- महापौर मुरलीधर मोहळ

हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत अंकिताचा विवाहसोहळा

Record Break : बीज गुणन केंद्राची किमया : 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन