कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. (sanjay raut)

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 10:31 AM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (shivsena leader sanjay raut slams devendra fadnavis)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. कोण काय बोलतंय याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी काय बोललो ते समजून घ्या आधी. या देशात एकापेक्षा जास्त नेते असू शकत नाही का? भाजपच्या काळात अटलबिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते. प्रमोद महाजन होते. बाळासाहेब ठाकरे होते. अनेक मोठे नेते देशात काम करू शकत नाही का? भाजपने राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा नीट अभ्यास करून बोलावं. अशी माझी त्यांना विनंती आहे. कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

प्रादेशिक पक्षांनीही राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलं

या देशात राज्याचा मुख्यमंत्री जो कोणी असतो तो राष्ट्रीय नेताच असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जात होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्व देशातील विरोधी पक्षनेते फार अपेक्षेने पाहतात. ममता बॅनर्जींकडेही पाहतात. शरद पवार तर या सर्वांच्या वर आहेत, असं त्यांनी सांगितलं. कधी तरी भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. आज पाच पंचवीस झाले. आज आमचे 18 खासदार आहेत. अनेकदा प्रादेशिक पक्षाचे लोकं सुद्धा दिल्लीतून नेतृत्व करताना पाहिलं आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

पवार राजकारणातले भीष्म पितामह

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज भेटत आहेत. पवार अनेकांना भेटत असतात. पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मदतीसाठी जोर लावावा लागेल

केंद्र सरकारने काल राज्याला मदत जाहीर केल्याचं संसदेत सांगितलं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मागच्या वर्षाची मदत आता मिळाली असेल तर या वर्षीच्या मदतीसाठी सर्व पक्षाच्या खासदार आणि केंद्रातील मंत्र्यांना जोर लावावा लागेल. ही तातडीची मदत आहे, असं मला मंत्र्यांच्या बोलण्यातून कळलं, असं ते म्हणाले. (shivsena leader sanjay raut slams devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!

उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता, तो दिवस लवकरच उगवेल; संजय राऊतांचं ट्विट

VIDEO: राज्यपाल नेहमीच घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; संजय राऊत संतापले

(shivsena leader sanjay raut slams devendra fadnavis)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.