शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांची पंजाबमध्ये हत्या; मंदिराच्या बाहेर निदर्शने करत असताना गोळ्या घातल्या

शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांची गोळया घालून हत्या करण्यात आली आहे. सूरी हे गोपाल मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन करत होते. यावेळी कुणी तरी त्यांच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांची पंजाबमध्ये हत्या; मंदिराच्या बाहेर निदर्शने करत असताना गोळ्या घातल्या
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 4:33 PM

अमृतसर: शिवसेना टकसालीचे (Shivsena) नेते सुधीर सूरी (Sudhir Soori) यांची गोळया घालून हत्या करण्यात आली आहे. सूरी हे गोपाल मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन करत होते. यावेळी कुणी तरी त्यांच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या सर्वांच्या समोर सूरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून अमृतसरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. प्रखर हिंदुत्ववादी नेते (hindu leader) म्हणून सूरी यांची पंजाबमध्ये ओळख होती. मात्र, महाराष्ट्रातील शिवसेनेशी त्यांचा कोणताही संबंध नाही.

गोपाल मंदिरच्या बाहेर कचऱ्यात देवाच्या मूर्त्या सापडल्याने त्याचा निषेधार्थ सुधीर सूरी यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. यावेळी कुणी तरी त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे सूरी जागीच कोसळले.

हे सुद्धा वाचा

गंभीर अवस्थेत असलेल्या सूरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सूरी यांच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्रं रचलं जात होतं. पोलिसांनी गेल्या महिन्यात काही गँगस्टरना अटकही केली होती. त्यांची विचारपूस केली असता त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली होती.

यापूर्वी गुरुवारीही सुधीर सूरी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. टिब्बा रोड येथील ग्रेवाल कॉलोनीतील पंजाबचे शिवसेना नेते अश्विनी चोपडा यांच्या घरासमोर दोन सायकलस्वारांनी त्यांच्यावर कथितरित्या गोळीबार केला होता. या हल्ल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर आज पुन्हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'.
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?.
मुख्यमंत्री फडणवीस? दिल्लीत फैसला पण देसाई,चंद्रकांतदादांचा सूर वेगळा?
मुख्यमंत्री फडणवीस? दिल्लीत फैसला पण देसाई,चंद्रकांतदादांचा सूर वेगळा?.
खातेवाटपावरुन इनसाईड स्टोरी, कोणाचे किती मंत्री अन कोणाकडे कोणती खाती?
खातेवाटपावरुन इनसाईड स्टोरी, कोणाचे किती मंत्री अन कोणाकडे कोणती खाती?.