Seema Haider | संशय होतं तेच घडलं, TV9 च्या स्टिंगमधून सीमा हैदरबद्दल धक्कादायक खुलासा
Seema Haider | सत्य शोधून काढण्यासाठी TV9 च स्टिंग ऑपरेशन. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे सीमावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. त्यामुळेच तिच्यावर हेर असल्याचा संशय आहे.
नवी दिल्ली : सीमा खरच ISI एजंट आहे, की फक्त प्रेमाचा विषय आहे. यूपी ATS कडून याच प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोमवारी नोएडा येथील सेक्टर 94 च्या कार्यालयात ATS ने सीमा हैदरची तब्बल 8 तास चौकशी केली. मंगळवारी नोएडाच्या सेक्टर 58 च्या ऑफिसमध्ये तब्बल 10 तास चौकशी झाली. सूत्राच्या माहितीनुसार, ATS ला तपासात महत्वाची माहिती मिळाली आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे सीमावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. त्यामुळेच तिच्यावर हेर असल्याचा संशय आहे. सीमा हैदर विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच पोलीस स्टेशनच्या SHO सोबत टीव्ही 9 भारतवर्षच्या स्पेशल इंवेस्टिगेशन टीमने चर्चा केली. जेवर पोलीस ठाण्याचे SHO मनोज कुमार सिंह यांना सीमा बाबत अनेक प्रश्न विचारले.
मनोज कुमार सिंह, SHO, जेवर- हॉटेलच पेमेंटही सीमानेच केलं. सचिनला तिने फिरवलं, खायला घातलं त्याला नेपाळच्या कॅसिनोमध्ये सुद्धा घेऊन गेली होती.
अंडरकवर रिपोर्टर – जिंकली की, हरली?
मनोज कुमार सिंह, SHO, जेवर – जे काही झालं असेल, असं वाटतय की, हनीट्रॅप टाइपच प्रकरण वाटतय. फिरवलं, खायला-प्यायला घातलं. सगळं स्टायलिश आहे. आतापर्यंत जे काही सांगितलय, ते खरं आहे.
अंडरकवर रिपोर्टर – ती खोट्या नावाने राहत होती, हे तिने सांगितलं का?
मनोज कुमार सिंह, SHO, जेवर – जे चुकीच केलं, ते तिने सांगितलं, जे योग्य केलं ते सुद्धा सांगितलं. जे खोटं बोलली, ते सुद्धा सांगितलं.
टीव्ही 9 च्या स्टिंगमध्ये सीमा बाबतच हे सत्य रेकॉर्ड झालय. तिला खूप चांगल्या पद्धतीने ट्रेंड केलय, यात अजिबात शंका नाही, असं जेवर पोलीस ठाण्याचे SHO मनोज कुमार सिंह यांनी सांगितलं.
SHO ने कॅमेऱ्यासमोर अजून काय सांगितलं?
मनोज कुमार सिंह SHO जेवर – काही ना काही सेटिंग आहे. ही नॉर्मल लेडी नाहीय. पूर्णपणे ट्रेंड लेडी आहे. ती ज्या पद्धतीने मीडियाला फेस करतेय, त्यावरुन सामान्य घरातील मुली किंवा गावातील मुली असं करु शकत नाहीत. मीडिया कॅमेऱ्यासमोर सीमा हैदरने जी प्रेमकथा सांगितली, त्यामुळे ती संशयाच्या फेऱ्यात आहे. सीमाने सांगितल, तितकी तिची प्रेमकथा सरळ नाहीय, त्यामुळे यूपी पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाला तिच्यावर संशय आहे, असं SHO ने कॅमेऱ्यासमोर सांगितलं.
अंडरकवर रिपोर्टर – किती पैसे घेऊन आलेली?
मनोज कुमार सिंह, SHO, जेवर – पहिल्यांदा आली, तेव्हा ती 6-7 लाख रुपये घेऊन आली होती. तिनेच नेपाळी करन्सीमध्ये 6000 रुपये पेमेंट केलं. काही ऑनलाइन ट्रन्जॅक्शनही केले.
अंडरकवर रिपोर्टर – सचिन मीणा परचून दुकानात नोकरी करतो. इतक्या महागड्या वस्तू कुठून विकत घेऊ शकतो?
मनोज कुमार सिंह SHO जेवर – 12-13 हजार रुपये मिळतात त्याला.
अंडरकवर रिपोर्टर – कोणी 5-6 हजार सांगत होतं.
मनोज कुमार सिंह, SHO, जेवर- 12-13 हजार रुपये मिळतात.
पहिल्यांदा सीमा पाकिस्तानातून किती लाख घेऊन आली?
सीमा पहिल्यांदा पाकिस्तानातून 6-7 लाख रुपये घेऊन आली. दुसऱ्यांदा सीमा नेपाळला आली, तेव्हा तिचे रुम भाड्याचे पैसे सचिनने दिले होते. UP पोलीस, ATS आणि IB ला सीमावर संशय आहे. सीमा हैदरसोबत आलेली मुलही संशयाच्या फेऱ्यात आहे.
कशा पद्धतीची ट्रेनिंग
मनोज कुमार सिंह SHO जेवर – सीमाला हिंदू कल्चरच्या हिशोबाने ट्रेंड केलं आहे. जर आपल्याला पाकिस्तानात जायच असेल, तर 6 महिने मुस्लिमाच्या घरी रहाव लागेल. कलमा सुद्धा वाचावा लागेल. हेराला भारतात यायच असेल, तर त्याला तिथे हिंदू कुटुंबासोबत ठेवलं गेलं असेल.