Luna 25 Crashed : लुना-25 चं क्रॅश लँडिंग, रशिया बसला इतक्या कोटींचा फटका

Luna 25 Crashed : रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का बसला. स्पेसक्राफ्ट लुना-25 रस्ता भरकटले. त्यानंतर चंद्रावर त्याचे क्रॅश लँडिंग झाले. लुना-25 मिशन फेल झाले. या मिशनवर इतके अब्ज रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

Luna 25 Crashed : लुना-25 चं क्रॅश लँडिंग, रशिया बसला इतक्या कोटींचा फटका
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 6:11 PM

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : रशियाच्या चांद्र मोहिमेला (Russia Moon Mission) मोठा धक्का बसला. अखेरच्या टप्प्यात, यश अगदी नजरेच्या टप्प्यात आले असताना ही मोहिम भरकटली. स्पेसक्राफ्ट लुना-25 (Luna-25 crash landing) रस्ता भरकटले. नंतर चंद्रावर त्याचे क्रॅश लँडिंग झाले. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, लुना-25 अनियंत्रीत झाल्याने हा अपघात झाला. या मोहिमेसाठी रशिया अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होता. 50 वर्षांपूर्वी रशियाने करुन दाखवले होते. त्यानंतर त्याच्या मोहिमांना यश आले नाही. या मोहिमेकडून रशियाला मोठी आशा होती. रशियाचे लुना-25 स्पेसक्राफ्ट 11 ऑगस्ट रोजी चंद्राकडे झेपावले होते. लुना-25 अनियंत्रित झाल्याने रशियाच्या अवकाश संस्थेला मोठे नुकसान झाले. या मोहिमेसाठी रशियाने भरभक्कम खर्च केला होता. आता भारताच्या चंद्रयान-3 कडे ( Chandrayaan-3) अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे मिशन आता चंद्राच्या अगदी जवळ आहे. भारत इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.

इतके झाले नुकसान

लुना-25 आपटल्याने रशियाला मोठा धक्का बसला. त्यांचा या मोहिमेवरील खर्च पाण्यात गेला. लुना-25 साठी जवळपास 200 दशलक्ष डॉलर (16,63,14,00,000 रुपये) खर्च आला होता. रशियाचे हे मिशन फेल झाल्याने 16.6 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. या 200 दशलक्ष डॉलरच्या रक्कमेतून अवकाश यान, त्याचे प्रक्षेपण, या मोहिमेचे नियंत्रण, चंद्रावरील डेटाची जमावाजमव करण्यात येणार होती. पण मोहिमेच्या अगदी अखेरच्या टप्प्यात हा अपघात झाला. भारताची चंद्रयान-2 मोहिमेत सुद्धा अखेरच्या टप्प्यात अपयश आले होते.

हे सुद्धा वाचा

साऊथ पोलच का?

रशियाच्या लुना-25 चे लक्ष्य चंद्राच्या दक्षिण ध्रुव क्षेत्रात उतरण्याचे आणि तिथली माहिती जमाविण्याचे होते. चंद्राचे दक्षिणी क्षेत्र एकदम खास आहे. याठिकाणी बर्फाच्या रुपाने पाण्याचे साठे आहेत. रशियाचे लुना-25 मध्ये स्पेक्ट्रोमीटर आणि कॅमेऱ्यासहीत अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणं होती. यामुळे चंद्राचा पृष्ठभाग, जमीन, तिथलं खनिजं, वातावरण याचा अभ्यास करण्यात येत होता. तिथली छायाचित्र समोर येणार होती.

भारताची मोहीम स्वस्त

चंद्रयान-3 च्या खर्चाची जगभर चर्चा आहे. चंद्रयान-3 चे बजेट अवघे 615 कोटी रुपये आहे. तर लुना-25 च्या खर्चाची रशियाने वाच्यता केली नाही. पण एका रिपोर्टनुसार या मोहीमेचा खर्च जवळपास 1,600 कोटी रुपये आहे. रशियाचे मिशन हे भारताच्या तुलनेत जवळपास अडीच पट जास्त आहे. चंद्रयान-2 पेक्षा पण चंद्रयान-3 चा खर्च कमी आहे. चंद्रयान-2 प्रमाणेच चंद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर नाही.

चंद्रयान मोहिमेसाठी इतका खर्च

  1. 2008 मधील चंद्रयान-1 साठी भारताने 386 कोटी रुपये खर्च केले होते.
  2. 2019 मधील चंद्रयान-2 मोहीमेसाठी एकूण 978 कोटी रुपयांचा खर्च आला होता.
  3. चंद्रयान-3 तयारी करण्यासाठी इस्त्रोला एकूण 615 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
  4. या तीनही मोहीमांसाठी एकूण 1,979 कोटी रुपयांचा खर्च आला.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.