भाजपात खांदेपालट, आपमध्येही मोठी घडामोड, पंजाब, गुजरात,उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध आप?

अलिकडेच करण्यात आलेल्या एका सर्व्हेत पंजाब, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये आपचा दबदबा वाढत असून तेच भाजपला टक्कर देतील अशी शक्यता वर्तवली जातेय. उत्तर प्रदेशही याला अपवाद नाही. ह्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपमध्येही संघटनात्मक बदल करण्यात आलेत

भाजपात खांदेपालट, आपमध्येही मोठी घडामोड, पंजाब, गुजरात,उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध आप?
अरविंद केजरीवाल यांची पाच वर्षासाठी राष्ट्रीय संयोजक म्हणून निवड करण्यात आली
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:23 PM

भाजपानं गेल्या वर्षभरात चार मुख्यमंत्री बदललेत. अनपेक्षीतपणे गुजरातमध्येही खांदेपालट केलीय. तिथेही नवा चेहरा मुख्यमंत्री असेल. दरम्यान भाजपला टक्कर देण्यासाठी आता काँग्रेस फारशी चर्चेत नाही. अलिकडेच करण्यात आलेल्या एका सर्व्हेत पंजाब, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये आपचा दबदबा वाढत असून तेच भाजपला टक्कर देतील अशी शक्यता वर्तवली जातेय. उत्तर प्रदेशही याला अपवाद नाही. ह्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपमध्येही संघटनात्मक बदल करण्यात आलेत आणि हा सर्वात मोठा बदल अरविंद केजरीवाल यांच्याबद्दलच आहे.

आपमध्ये काय बदल करण्यात आलाय? आम आदमी पक्षाच्या (AAP)राष्ट्रीय परिषदेची बैठक पार पडलीय. ह्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय संयोजक म्हणून निवड करण्यात आलीय. पंकजा गुप्ता यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय तर राज्यसभा खासदार असलेले एन डी गुप्ता हे पक्षाचे खजिनदार असतील. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आलाय. आधी राष्ट्रीय संयोजकाचा कार्यकाळ हा फक्त तीन वर्षांचा होता. म्हणजे असे दोनच कार्यकाळ मंजुर होते. म्हणजे एखादा पदाधिकारी फार फार सहा वर्षांसाठी असू शकत होता. त्यात बदल करण्यात आलाय. आता हे तिघेही जण पाच वर्षांसाठी पदावर असतील.

आपची फिनिक्स भरारी आपनं दिल्लीमध्ये सलग सत्ता मिळवलीय. पंजाबमध्ये सध्या आप हा विरोधी पक्षात आहे आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिथं आप हा सत्ताधारी होण्याची चिन्हं आहेत. अलिकडेच आलेल्या सर्व्हेत तसा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तराखंडमध्ये भाजपानं दोन मुख्यमंत्री बदललेत. पुढच्या वर्षी तिथेही निवडणुका आहेत. तिथली सत्ता राखण्याचं आव्हान भाजपासमोर असेल तर ती मिळवण्यासाठी आपनं आताच कंबर कसलीय. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही घोषीत केलाय. गोव्यात भाजपला आप टक्कर देईल असा सर्व्हेचा अंदाज आहे. म्हणजे इथेही भाजप विरुद्ध आप असाच सामना होण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्येही आप गुजरातची दोन दशकाची सत्ता राखण्याचं सर्वात मोठं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. असं असलं तरी होम ग्राऊंड राखलं तरच त्याचा काही फायदा देशपातळीवर होऊ शकतो. गुजरातमध्ये मागच्या वेळेस भाजपा 99 च्या फेऱ्यात अडकली होती. त्यावेळेस आपची आताएवढी चर्चाही नव्हती आणि ताकदही. पण सुरतच्या स्थानिक निवडणुकीत आपनं चांगलं यश मिळवलंय. तीच भाजपासाठी धोक्याची घंटा मानली जातेय. आपला यश मिळताना दिसताच काही मोठ्या व्यक्तीही गुजरात आपमध्ये सहभागी झाल्यात. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आपमध्ये सध्या तरी मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत.

पंजाबमध्ये केजरीवाल बल्ले बल्ले सी-व्होटर (c voter) नावाच्या कंपनीने एका खासगी टीव्ही चॅनेलसाठी हे सर्वेक्षण केलय. त्यानुसार पंजाबमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. यात आम आदमी पक्षाला बहुमतासाठी काही जागा कमी पडतील असा अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार, गेल्या निवडणुकीत 20 जागांसह मुख्य विरोधी पक्ष बनलेल्या ‘आप’ला 117 सदस्यांच्या विधानसभेत 51 ते 57 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राज्याचा सत्ताधारी काँग्रेस पक्ष 38 ते 46 जागा जिंकून दुसरा क्रमांक पटकावेल. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 77 जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपा खाते उघडणार नाही किंवा केवळ एखाद्याच जागेची शक्यताय.

बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा साधेपणा दाखवणारा फोटो व्हायरल

5 राज्यात काँग्रेस साफ होणार? पंजाबमध्ये ‘आप’ सरकार? 2024 ला भाजपसाठी मार्ग सुकर? वाचा सर्वेक्षणाचं सविस्तर विश्लेषण

सरकार एनपीएसमध्ये करणार हा मोठा बदल, कंपनी कायद्यात येऊ शकते पेन्शनचे काम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.