पहिलं मोठं यश ! श्रद्धाच्या वडिलांशी जंगलातील ‘त्या’ हाडांचे DNA जुळले; आफताबनेच हत्या केल्याचं उघड
आता कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आणि कोर्टात युक्तिवाद करून गुन्हा सिद्ध करण्यात काहाही अडचण येणार नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्यांकाडप्रकरणात दिल्ली पोलिसांच्या हाती पहिला पुरावा आला आहे. आफताबच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी जंगलातून गोळा केलेल्या हाडांचे डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळले आहेत. त्यामुळे श्रद्धाची हत्या आफताबनेच केल्याचं सिद्ध होत आहे. पोलिसांना हा पहिला पुरावा हाती लागल्यामुले आता या हत्याकांडातील तपास कामाला वेग येणार आहे.
फॉरेन्सिक लॅबकडून ही माहिती देण्यात आली आहे. छतरपूरच्या जंगलातून काही हाडे गोळा करण्यात आली होती. या हडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी मॅच झाला आहे. याचा अर्थ श्रद्धाची हत्या झाली आहे. जंगलात सापडलेली सडलेली हाडे श्रद्धाचीच असल्याचं समोर आलं आहे.
आफताबने दिलेल्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी जंगलात झाडाझडती घेऊन ही हाडे ताब्यात घेतली होती. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबमध्ये ब्लड क्लांट आणि या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनशी जुळवण्यात आला. त्याचा रिपोर्ट आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या शिवाय आफताबच्या फ्लॅटमधील टाईल्समध्ये रक्ताचे नमुने सापडले होते. त्यातूनही श्रद्धाचा खून झाल्याचं स्पष झालं आहे. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आणि कोर्टात युक्तिवाद करून गुन्हा सिद्ध करण्यात काहाही अडचण येणार नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, फॉरेन्सिक टीमने पोलिसांना डीएनए जुळल्याची तोंडी माहिती दिल्याचं सांगितलं जातं. अधिकृत रिपोर्ट देण्यासाठी अजून दोन चार दिवस लागणार आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे करवतीने तुकडे करण्यात आल्याचंही फॉरेन्सिकच्या तपासात उघड झालं आहे.
या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. या फुटेजमध्ये आफताब एक बॅग घेऊन मध्यरात्री बाहेर जाताना दिसत आहे. छतरपूरच्या एका घराला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये आफताबचे कारनामे कैद करण्यात आले आहे. पोलिसांनी ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.
श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आफताब जात असतानाचे हे फुटेज असल्याचं सांगितलं जात आहे. एका बॅगेत काही तरी घेऊन तो जंगलाच्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे.
विशेष म्हणजे या बॅगेत काही तरी भारी वस्तू ठेवलेली असावी अशा पद्धतीने ही बॅग फुगलेली दिसत आहे. त्यामुळे पोलीस त्यानुषंगानेही तपास करत आहे.