मोठी बातमी : अखेर कर्नाटकाचा तिढा सुटला, बुजुर्ग नेता होणार मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री किती?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या चार ते पाच दिवसाच्या सस्पेन्सनंतर अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडली आहे.

मोठी बातमी : अखेर कर्नाटकाचा तिढा सुटला, बुजुर्ग नेता होणार मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री किती?
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 1:25 PM

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या चार ते पाच दिवसाच्या सस्पेन्सनंतर अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडली आहे. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. सिद्धारमैया हे काँग्रेसचे बुजुर्ग नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वीही कारभार पाहिला आहे. तसेच प्रशासनावर त्यांची प्रचंड पकड आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. नवे मुख्यमंत्री उद्याच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सिद्धरामैया यांच्या नावाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धारमैया उद्या दुपारी 3.30 वाजता पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. त्यामुळे शपथविधी सोहळ्याची तयारी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या बंगळुरूमध्ये विधिमंडळ दलाची बैठक होईल. त्यावेळी पुढील रणनीतीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हॉटेलला परतले, पुन्हा बैठक

सिद्धारमैया दिल्लीत आहेत. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते ज्या हॉटेलात उतरले होते, त्याच हॉटेलात परत आले आहेत. तेही आपल्या मुख्यमंत्रीपदी आपल्या नावाची घोषणा होण्याची वाट पाहत आहेत. आजच सिद्धारमैया यांचं नाव घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. आज दुपारी दीड वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार उपस्थित राहणार आहेत. बैटकीनंतर मुख्यमंत्रीपदाची घोषणा करण्यात येणार आहे.

डीकेंकडे प्रदेशाध्यक्षपदही

सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात डीके शिवकुमार एकटे उपमुख्यमंत्री असतील. त्यांना दोन खातीही दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच महत्त्वाच्या खात्यांचा पदभारही त्यांच्याकडे असणार आहे. याशिवाय डीके शिवकुमार यांच्याकडेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे असणार आहेत. त्यामुळे पक्षातील डीके यांचं वर्चस्व कायम राहणार आहे.

फॉर्म्युल्यावर सस्पेन्स

दरम्यान, सिद्धारमैया किती वर्षासाठी मुख्यमंत्री असतील? सिद्धारमैया दोन वर्षासाठी मुख्यमंत्री असतील का? पुढची तीन वर्ष डीके शिवकुमार यांना मिळणार का? यावर अजूनही सस्पेन्स असून त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

12 निवडणुका लढल्या

सिद्धारमैया हे कर्नाटकातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. सिद्धारमैया यांनी आतापर्यंत 12 निवडणुका लढल्या आहेत. त्यापैकी 9 निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. सिद्धारमैया यांनी यापूर्वीही कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलेली आहे. तसेच 1994मध्ये ते जनता दल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. प्रशासनावर प्रचंड पकड असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण नाहीये. तर डीके शिवकुमार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे सुरू आहेत. भ्रष्टाचार प्रकरमी डीके शिवकुमार तुरुंगातही जाऊन आलेले आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.