तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू, प्राचार्य आणि वसतिगृहाच्या वॉर्डनला अटक

घरी आल्यावर मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु होते.

तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू, प्राचार्य आणि वसतिगृहाच्या वॉर्डनला अटक
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 12:15 AM

तामिळनाडू : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तामिळनाडूतील अल्पवयीन गरोदर शाळकरी मुलीचा उपचारा दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूप्रकरणी शाळेचे मु्ख्याध्यापक, वसिगृहाचा वार्डन आणि अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोस्को कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी मूळची चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम गावातील रहिवासी असून तिरुवन्नमलाई येथील शाळेत शिकत होती.

उपचारासाठी रुग्णालयात नेले असता गरोदर असल्याची बाब उघड

पीडित मुलगी तिरुवन्नमलाई येथील शाळेतील वसतिगृहात राहत होती. काही दिवसांपूर्वी पीडिता आपल्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम गावी आली होती. घरी आल्यावर मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु होते.

यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेच्या शेजारीच हरिप्रसाद नावाची व्यक्ती राहते. या व्यक्तीनेच मुलीचे लैंगिक शोषण केल्याने मुलगी गरोदर राहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी या विद्यार्थीनीचा रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या वॉर्डनने माहिती लपवली

मुलीसोबत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या वार्डनला होती. मात्र त्यांनी याबाबत पोलिस आणि बाल संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांपासून ही माहिती लपवून ठेवली. याप्रकरणी पोलिसांनी हरिप्रसादला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे. यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या वॉर्डनलाही अटक करण्यात आली आहे. बाल संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला याबाबत माहिती दिली नाही.

बिहारमध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस

दुसरीकडे बिहारमधील गया येथेही प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गया जिल्ह्यातील मोहनपूर गावात राहणाऱ्या एका तरुणाचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले. दोघेही फोनवर भेटून बोलू लागले. काही दिवस दोघांमध्ये शारीरिक संबंध होते. यादरम्यान मुलगी गरोदर राहिली. मात्र यानंतर तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. मात्र, दबावाखाली तरुणाने मुलीच्या मागणीत सिंदूर लावून लग्नाचे नाटक केले आणि याच दरम्यान मुलीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्याने मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सदर तरुणाला अटक केली आहे. (Six-month-pregnant schoolgirl dies in Tamil Nadu, Principal and hostel warden arrested)

इतर बातम्या

इंदापूरमधील भिशी फसवणूक आकडा तब्बल 200 कोटींवर, शेकडो सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक

धक्कादायक ! साताऱ्यात माजी सरपंचाची वनरक्षक दाम्पत्याला मारहाण, घटनेत गर्भवती महिला वनरक्षक जखमी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.