देशातील पहिली 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन, सेवेत असणार हॉस्टेस
lagari train in india: रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहे. तसेच या ट्रेनमध्ये राजधानीप्रमाणे थर्ड एसी, सेकेंड एसी आणि फर्स्ट एसी कोच असणार आहे. बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमचे डिझाईन राजधानी ट्रेनपेक्षा वेगळे असणार आहे. ही ट्रेन 160 किमी. प्रती तास वेगाने धावू शकते.
भारतीय रेल्वेत चांगलेच बदल होऊ लागले आहे. सेमी हायस्पीड असणारी वंदे भारतनंतर बुलेट ट्रेन भारतात दाखल होत आहे. त्याचबरोबर आता 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन भारतीय रेल्वे सुरु करणार आहे. त्याला चालते फिरते 5 स्टार हॉटेल म्हणता येईल. सर्व प्रकारच्या सुविधा या रेल्वेत असणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एअर हॉस्टेस असणार आहेत. या रेल्वेचा वेग 130 किमी. प्रतीतास असणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून ही रेल्वे ट्रॅकवर धावणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा देत आहेत. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन देशात चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आता लांब पल्यासाठी लग्झरी ट्रेन स्लीपर वंदे भारतही ट्रॅकवर उतरणार आहे. या ट्रेनसाठी 100 दिवसांचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही ट्रेन धावणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन राजधानी ट्रेन सुरु असणाऱ्या ट्रॅकवर चालवली जाणार आहे.
राजधानीसारख्या तीन श्रेणी
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहे. तसेच या ट्रेनमध्ये राजधानीप्रमाणे थर्ड एसी, सेकेंड एसी आणि फर्स्ट एसी कोच असणार आहे. बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमचे डिझाईन राजधानी ट्रेनपेक्षा वेगळे असणार आहे. ही ट्रेन 160 किमी. प्रती तास वेगाने धावू शकते.
अशा असतील सुविधा
वंदे भारतमध्ये ट्रेनमध्ये ज्याप्रमाणे चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फरक आहे, तसा फरक या लग्झरी ट्रेनमध्ये असणार आहे. या ट्रेनमध्ये थर्ड आणि सेकंड एसीच्या तुलनेत फर्स्ट एसीमध्ये प्रवाशांना अधिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात बर्थ आणि कुशन असतील. या श्रेणीतील प्रवाश्यांना विमानसेवेसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय इतर श्रेणींच्या तुलनेत यातील खाणपाण वेगळे असणार आहे. तसेच या डब्यांमध्ये अटेंडंटची संख्याही अधिक असणार आहे. एकंदरीत पुढील काही वर्षांत भारतीय रेल्वे पूर्ण कात टाकणार आहे.