लातूरच्या तरुणाचं म्हैसूर कनेक्शन? संसदेत जाण्यासाठी कोणत्या खासदाराने दिला पास?

देशाचं सर्वोच्च मानलं जाणाऱ्या सभागृहात अचानक दोन इसम येतात. ते प्रेक्षक गॅलरितून थेट सभागृहात एन्ट्री करतात. स्मोक बॉम्ब फोडतात. पिवळा धूर सभागृहात करतात, आणि घोषणाबाजी करतात. या भयानक घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेचा भोंंगळ कारभार समोर आलाच. पण इतकी भयानक डेरिंग करणाऱ्या महाराष्ट्राच्या लातूरच्या तरुणाचं या कृत्यात म्हैसूर कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

लातूरच्या तरुणाचं म्हैसूर कनेक्शन? संसदेत जाण्यासाठी कोणत्या खासदाराने दिला पास?
parliment smoke attacked
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 4:23 PM

नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : देशातील अतिशय महत्त्वाचं ठिकाण मानलं जाणाऱ्या संसदेत आज अचानक दोन जण घुसले. ते प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात येतात. तिथे ते जोरदार घोषणाबाजी करतात आणि नंतर लक्ष वेधण्यासाठी स्मोक बॉम्ब फोडतात. त्यामुळे भर सभागृहात पिवळा धूर उडायला लागतो. अचानक सुरु झालेल्या या गोंधळामुळे काही खासदारही घाबरतात. नेमकं काय सुरु आहे, हे क्षणार्धासाठी समजत नाही. पण घटनेचं गांभीर्य ओळखून काही खासदार घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला पकडण्यासाठी धावतात. खासदार या तरुणाला पकडतात. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करतात. यावेळी या तरुणासोबत घोषणाबाजी करणाऱ्या महिलेलादेखील पोलिसांनी अटक केली.

संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. संसदेवर हल्ल्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी समोर येतात. या घटनेतील दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. यात महाराष्ट्रातील 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर दुसरी व्यक्ती ही हरियाणाची 42 वर्षीय महिला नीलम कौर सिंह आहे. हे दोन्ही जण एका खासदाराच्या पासवर संसदेत शिरले होते.

भाजप खासदाराच्या पासवर आतमध्ये शिरले

संसद हे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे. त्यामुळे हे दोनही इसम या सभागृत स्मोक कँडल घेऊन कसे शिरले? असा प्रश्न उपस्थित होतोय. ही सुरक्षेतील सर्वात मोठी चूक आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान हे दोन्ही इसम ससंदेच्या सभागृहात शिरले कसे? याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही जण एका खासदाराच्या पासवर आतमध्ये शिरले, अशी माहिती समोर आलीय. मध्य प्रदेशच्या म्हैसूर मतदारसंघाचे खासदार प्रताम सिम्हा यांच्या नावाच्या पासने हे दोन्ही इसम आले होते. सिम्हा हे भाजप खासदार आहेत. त्यामुळे संसदेत घोषणाबाजी करणाऱ्या महाराष्ट्राच्या लातूरच्या तरुणाचं हे म्हैसूर कनेक्शन तर नाही ना? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.

खासदार प्रताप सिम्हा कोण आहेत?

भाजपचे खासदार प्रताप सिम्हा हे 42 वर्षांचे आहेत. ते पेशाने पत्रकार देखील होते. त्यांनी पत्रकारितेत मास्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. विजय कर्नाटक समचार येथून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या करियरला सुरुवात केली होती. प्रताम सिम्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक पुस्तक देखील लिहिलं आहे. ‘नरेंद्र मोदी : द अनट्रोडेन रोड’ असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रताम सिम्हा आणि अमोल शिंदे, नीलम कौर सिंह यांचं काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.

अमोल शिंदे कोण आहे?

या प्रकरणातील तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. त्याचे आई-वडील हे मजूर आहेत. अमोल शिंदे हा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. तो जेव्हापासून कॉलमध्ये शिक्षणासाठी जातोय तेव्हापासून तो घरी देखील गेलेला नाही. पोलीस अधिक्षकांनी अमोल शिंदे याच्याबद्दल अधिकची माहिती काढण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.