नवी दिल्ली, दि.18 डिसेंबर | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती पाकिस्तानी सोशल मीडियातून आली. पाकिस्तानी पत्रकार आणि आरजू काजमी हिने आपल्या यु ट्यूब चॅनल Arzoo Kazmiवर सर्वात प्रथम ही बातमी दिली. त्यात अनेक दावे करण्यात आले आहे. तिने म्हटले आहे की, ही बातमी कितपत खरी आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. परंतु बातमी सत्य नसती, बातमीत तथ्य नसते तर पाकिस्तानी सोशल मीडिया डाऊन झाले नसते. कारण भारताने किंवा अफगाणिस्ताने पाकिस्तानवर हल्ला केला नाही. पाकिस्तानात युद्ध सुरु झाले नाही. पाकिस्तानात सर्व काही सुरळीत सुरु आहे. त्यानंतर सोशल मीडिया का बंद केला? दाऊदच्या बातमीसंदर्भात जावेद मियांदाद याच्याकडून दुजोरा घेतला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. जावेद मियांदाद हा दाऊद यांचा व्याही आहे, असे आरजू काजमी हिने म्हटले आहेच
आरजू काजमी हिने व्हिडिओत म्हटले आहे की, दाऊद याच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यासंदर्भातील बातम्या बाहेर येऊ नये, यामुळे सोशल मीडिया डाऊन करण्यात आले आहे. पाकिस्तानात वरिष्ठ पातळीवर काही तरी मोठे सुरु आहे. दाऊद याची बातमी खरी असली तर लोकांसाठी चांगलीच असणार आहे. कारण या पद्धतीने दहशतवादी संपवले जात आहे. यामुळे पाकिस्तानात जे दहशतवादी आहेत, त्यांनाही संदेश दिला जाणार आहे. कारण आतापर्यंत पाकिस्तानात जे दहशतवादी मारले गेले ते दहशतवादी संघटनेचे प्रमुख किंवा सर्वात महत्वाची व्यक्ती नव्हते. परंतु दाऊद मारला गेला असले तर प्रथमच मोठ्या दहशतवाद्यास हात लावला गेला आहे. तसेच या माध्यमातून त्या मुख्य दहशतवाद्यांना संदेश पोहचवला गेला आहे. दाऊद हा भारतीय आहे. भारताने अनेक वेळा दावा केला की, तो कराचीत राहत आहे. भारतीय माध्यमांनी त्याचे कराचीतील घर अनेक वेळा दाखवले आहे.
पाकिस्तानातील हाफिज सईद, सय्यद सल्लाउद्दीन, मसूद अजहर या मोठ्या दहशतवाद्यांना दाऊदच्या माध्यमातून संदेश दिला गेला आहे. कारण हे बडे दहशतवादी आहे. दहशतवादी संघटनेचे मोरखे आहेत. ही लोक संपूर्ण दहशतवादी संस्था चालवतात. अनेक लोकांची हत्या करतात, असे आरजू काजमी हिने म्हटले आहे. पाकिस्तानात एकामागे एक दहशतवादी मारले जात आहे. पाकिस्तानच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत दहशतवादी मारले जात आहे. साजीद मीर या दहशतवाद्याला कारागृहात विष दिले गेले आहे. पाकिस्तान आर्मी चीफ अमेरिकेत आहे. त्याच्या या दौऱ्यात खूप काही घडले आहे, असे तिने म्हटले. पाकिस्तानात दहशतवाद्यांची होत असलेल्या हत्येमुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. पाकिस्तानने नेहमी या दहशतवाद्यांना वाचवले आहे. आमचे सत्तेत असलेले राजकारणी या सर्व दहशतवाद्यांना नेहमी हाफीज साहब म्हणत असतात. जिहादसाठी पाकिस्तानात ठिकठिकाणी डोनेशन बॉक्स ठेवले आहे. त्या ठिकाणी महिला आपले दागिनेसुद्धा टाकत असतात.