50 वर्षांतील सर्वात भयंकर सौर वादळ, इस्त्रोच्या Aditya-L1 घेतले घातक सौर लहरीचे फोटो
Solar flares: सौर वादळामुळे पृथ्वीवरील काही भागांत हाय फ्रिक्वेंसी रेडिओ सिग्नल संपले होते. सूर्यावर जो सनस्पॉट तयार झाला आहे तो पृथ्वीपेक्षा 17 पट मोठा आहे. सूर्यावरुन आलेल्या तीव्र लहरीमुळे उत्तरी ध्रुवावरील भागात वायूमंडळ सुपरचार्ज झाला आहे.
सूर्याकडून गेल्या चार दिवसांत पृथ्वीच्या दिशेने सर्वात शक्तिशाली सौर लहरी फेकल्या गेल्या आहेत. ही सौर लहर म्हणजे X8.7 तीव्रतेचा स्फोट होता. गेल्या 50 वर्षांत प्रथमच सूर्यापासून एवढी शक्तिशाली प्रमाणात सौर लहरी निघाल्या आहेत. या सौर लहरी 11 ते 13 मे दरम्यान दोनदा स्फोट झालेल्या ठिकाणापासून निघाल्या आहेत. इस्रोच्या आदित्य-एल1 या अंतराळयानानेही या काळात सूर्याकडून येणाऱ्या सौर लहरी टिपल्या आहेत.
चांद्रयान-2 ने या वादळाचे घेतले फोटो
इस्रोच्या आदित्य-L1 ने 11 मे रोजी X5.8 तीव्रतेची लाट पकडली. भारत आणि त्याच्या आसपासच्या भागांना सौर वादळाचा फटका बसला नाही. परंतु अमेरिकन आणि पॅसिफिक महासागराच्या वरच्या भागात त्याचा परिणाम जाणवला. एवढेच नाही तर चांद्रयान-2 ने या वादळाचे फोटो घेतले आहेत. इस्त्रोने दिलेल्या या माहितीला नासाकडून दुजोरा मिळाला आहे. वॉशिंग्टनमधील नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) या सेंटरने सूर्यापासून निघालेल्या या धोकादायक लहरी पहिल्या आहेत. गेल्या 50 वर्षांत अशा लहीर आल्या नव्हत्या. यामुळे पृथ्वीवर रेडिओ ब्लॅकआउट्स होण्याचा धोका आहे. हा धोका मेक्सिको भागात जास्त आहे.
चार दिवसांत तीन मोठे स्फोट
11 ते 14 मे दरम्यान सूर्यावर तीन मोठे स्फोट झाले. हे स्फोट एकाच ठिकाणावरुन झाले आहेत. त्यामुळे या आठवड्याअखेरी विनाशकारी सौर वादळ आले होते. सूर्यात अजूनही स्फोट होत आहे. 10 मे 2024 रोजी सूर्यावर एक एक्टिव डाग दिसला. त्याला AR3664 नाव दिले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तीव्र स्फोट झाला. सूर्याची एक लहर पृथ्वीकडे आली. ही X5.8 क्लासची सौर लहर आहे.
सौर वादळामुळे हा धोका
सौर वादळामुळे पृथ्वीवरील काही भागांत हाय फ्रिक्वेंसी रेडिओ सिग्नल संपले होते. सूर्यावर जो सनस्पॉट तयार झाला आहे तो पृथ्वीपेक्षा 17 पट मोठा आहे. सूर्यावरुन आलेल्या तीव्र लहरीमुळे उत्तरी ध्रुवावरील भागात वायूमंडळ सुपरचार्ज झाला आहे. सध्या सूर्यावर जियोमॅग्रेटिक वादळ येत आहेत. त्याला वैज्ञानिक भाषेत एक्स-क्लास (X class) म्हणतात. पुढील आठ वर्ष या पद्धतीचे सौर वादळ येण्याचा धोका कायम आहे.
ISRO Captures the Signatures of the Recent Solar Eruptive Events from Earth, Sun-Earth L1 Point, and the Moonhttps://t.co/bZBCW9flT1 pic.twitter.com/SaqGu5LjOV
— ISRO (@isro) May 14, 2024