जवानाचा विमान अपघातात झाला होता मृत्यू, 56 वर्षांनंतर मिळाला मृतदेह… दरम्यान आई, वडील, पत्नी अन् मुलीचाही मृत्यू

मलखान सिंग यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या जवानांनी त्यांच्या मूळ गावी फतेहपूर येथे आणला. त्यानंतर 3 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी हजारो लोक आले होते

जवानाचा विमान अपघातात झाला होता मृत्यू, 56 वर्षांनंतर मिळाला मृतदेह... दरम्यान आई, वडील, पत्नी अन् मुलीचाही मृत्यू
56 वर्षांनंतर मलखान सिंह यांचा मृतदेह आला.
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 7:31 PM

7 फेब्रुवारी 1968 रोजी भारतीय हवाई दलाच्या AN-12 विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील जवान मलखान सिंह शहीद झाले होते. परंतु त्यांचा मृतदेह मिळाला नव्हता. त्यामुळे 1968 पासून ते बेपत्ता असल्याचे म्हटले जात होते. परंतु 56 वर्षानंतर हिमाचल प्रदेशातील रोहतांग दर्रे येथे त्यांचा मृतदेह मिळाला. त्यांचा मृतदेह बॅच नंबरवरुन ओळखला गेला. 56 वर्षांनंतर त्यांचा गावी त्यांच्या मृतदेहवर नातूने अंत्यसंस्कार केले. ज्या विमान अपघातात मलखान सिंह होते, त्या विमातातून 102 सैनिक जात होते.

7 फेब्रुवारी 1968… AN-12 विमानाने चंदीगडहून लेहसाठी उड्डाण केले. परंतु काही वेळाने ते बेपत्ता झाले. 56 वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या या विमानाचा रोहतांग खिंडीत अपघात झाला होता. विमानात 102 लोक होते. त्यातून कोणीच वाचले नाही. त्या विमानाचे अवशेष 2003 मध्ये सापडले होते. अनेक दशके बर्फाच्छादित भागात जवानांचे मृतदेह आणि अवशेष पडून राहिले.

मलखान सिंग विवाहित

दरम्यान, डोग्रा स्काउट्सच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराचे शोध आणि बचाव कार्य सुरूच होते. हे देशातील सर्वात मोठे बचाव कार्य असल्याचे बोलले जात आहे. आता त्यात भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. लष्कराने हिमाचल प्रदेशमधील अपघातस्थळावरून चार मृतदेह बाहेर काढले, त्यापैकी एक वायुसेनेचा सैनिक मलखान सिंगचा होता. अटल सरकारच्या कार्यकाळात लष्कराने 2003 मध्ये बचाव कार्य सुरू केले आणि 2019 पर्यंत 5 मृतदेह बाहेर काढले. नुकतेच, जेव्हा लष्कराला आणखी 4 मृतदेह सापडले, तेव्हा एका जवानाची ओळख नानौता पोलिस स्टेशनच्या फतेहपूर गावातील रहिवासी मलखान सिंह असल्याचे सांगण्यात आले. मलखान सिंग विवाहित होते. त्यांना रामप्रसाद हा मुलगा होता. परंतु त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी आणि आई-वडील यांचाही मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

अपघाताच्या वेळी मलखान सिंग 23 वर्षांचे

मलखान सिंग यांचा जन्म 18 जानेवारी 1945 रोजी झाला. ते बेपत्ता झाले तेव्हा केवळ 23 वर्षांचे होते. अपघातानंतर त्याचा शोध लागला नव्हता. मलखान सिंगचे आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य त्याच्या परत येण्याची वर्षानुवर्षे वाट पाहत होते. परंतु त्यांची कोणतीही माहिती मिळाली नव्हती.

मलखान सिंग यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या जवानांनी त्यांच्या मूळ गावी फतेहपूर येथे आणला. त्यानंतर 3 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी हजारो लोक आले होते. ‘मलखान सिंग जिंदाबाद’च्या घोषणा सर्वत्र गुंजल्या. मलखान सिंग यांचा नातू गौतम याने त्यांच्या चितेवर अंत्यसंस्कार केले. त्यांचा अंतिम संस्कार पूर्ण लष्करी सन्मानाने करण्यात आले.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.