जावयाचं सासूवर जडलं प्रेम, पत्नीला कळताच तिने…
Love affair viral news : पता-पत्नीच्या नात्यात तिसरी व्यक्ती आली तर ते नातं टिकत नाही. विश्वासाला तडा जातो. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये प्रेम संबंधामुळे नाते तुटले आहे. अनेकांनी तर अशा प्रकरणात धक्कादायक पाऊल देखील उचलले आहे. जावई आणि सासूमधील प्रेम संबधाची अशीच एक घटना समोर आली आहे.
Love Affair : नात्याची मर्यादा तोडून जर कोणीही प्रेम करत असेल तर त्याला ते महागात पडू शकतं. बिहारमधील जमुईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचे त्याच्याच सासूवर प्रेम जडले. दुसरीकडे सासूलाही जावई आवडायला लागला. त्यानंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. दोघेही गुपचूप भेटू लागले. मात्र जेव्हा पत्नीला पती आणि आई मधल्या अफेयरची माहिती कळाली तिने धक्कादायक पाऊल उचललं. तिने गावकऱ्यांच्या मदतीने पतीला बेदम मारहाण केली.
पतीला बेदम मारहाण
हे प्रकरण आहे लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळा या गावातील. सुनील कुमार यादव नावाच्या तरुणाला गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं. सुनीलला जेव्हा रंगेहात पकडलं तेव्हा त्याच्या सोबत असलेल्या महिलेला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. कारण ती महिला दुसरी कोणी नसून त्याचीच सासू होती. गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडल्यानंतर त्याच्या पत्नीला याबाबत माहिती दिली. पत्नी घटनास्थळी आल्यानंतर तिने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी तिने गावकऱ्यांच्या मदतीने पतीला झाडाला बांधले. त्यानंतर चप्पलाने आणि झाडूने बेदम मारहाण केली.
सुनील तीन मुलांचा बाप
सुनील आणि त्याच्या पत्नीला तीन मुले आहेत. असे असतानाही त्याचे सासूवर प्रेम जडले. पण सासूशी प्रेमसंबंध ठेवणे युवकाला सांगतेच महागात पडले. बुधवारी रात्री सुनील जेव्हा प्रेयसीला भेटण्यासाठी काळा गावात पोहोचला तेव्हा गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर तेथे गावकरी जमले. पत्नीला संताप अनावर झाला आणि तिने पतीला मारहाण केली.
या दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरु केली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.