Hariyana: हरियाणात कौटुंबिक कलहातून सुपारी देऊन मुलाने केली वडिलांची हत्या, सोनीपत येथील धक्कादायक घटना
हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील माचरी गावात राहणारे राजेंद्र नावाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार 2 डिसेंबर रोजी त्यांचा मुलगा मोहित याने मोहना पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर सोनीपत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर या प्रकरणाचा थरार उघड झाला.
सोनीपत : कौटुंबिक कलह आणि पैशाच्या व्यवहारातून एक निर्दयी मुलाने स्वतःच्याच वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील माचरी गावात राहणाऱ्या मोहित नावाच्या व्यक्तीने कौटुंबिक कलह आणि पैशाच्या व्यवहारातून वडिलांची हत्या केली. यासाठी मोहितने आपल्या दोन मित्रांना सात लाख रुपयांची सुपारी देऊन त्याने वडील राजेंद्र यांची हत्या घडवून आणली. त्यानंतर आरोपी मुलाने वडिल बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
पोलिस चौकशीत मोहितने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या इतर दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सचिन आणि मनदीप अशी हत्येची सुपारी घेणाऱ्या आरोपींचीनावे आहेत. सचिन हा जाजी गावचा रहिवासी आहे आणि मनदीप हा गुमाडचा रहिवासी आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
वडिल बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल केली
हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील माचरी गावात राहणारे राजेंद्र नावाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार 2 डिसेंबर रोजी त्यांचा मुलगा मोहित याने मोहना पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर सोनीपत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर या प्रकरणाचा थरार उघड झाला. राजेंद्र यांचा मुलगा मोहित याने वडिलांची सुपारी जाजी गावातील सचिन आणि गुमाड येथील मनदीप यांना 7 लाखांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानंतर सचिन आणि मनदीपने राजेंद्रचा गळा दाबून खून केला आणि नंतर त्यांचा मृतदेह सापडू नये म्हणून उत्तर प्रदेशातील गंगा कालव्यात फेकून दिले.
या घटनेमागचे जे कारण समोर आले ते थक्क करणारे आहे. मोहितने पोलिसांसमोर खुलासा केला की राजेंद्रने मोहितला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्याच्या कुटुंबात मतभेद झाले. त्यामुळेच त्याने हा गुन्हा केला.
7 लाखांची सुपारी देऊन वडिलांची हत्या केली
या प्रकरणाची माहिती देताना सोनीपतच्या अतिरिक्त एसपी उपासना यांनी सांगितले की, 2 डिसेंबर रोजी मोहना पोलीस ठाण्यात माछरी येथे राहणार्या मोहित नावाच्या व्यक्तीने त्याचे वडील राजेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सोनीपत पोलिसांनी याबाबत जनतेला माहिती दिली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता मोहितचे दोन मित्र सचिन आणि मनदीप यांना चौकशीसाठी बोलावले. मोहितने 7 लाखांची सुपारी देऊन वडिलांची हत्या केल्याचे त्याने उघड केले. त्यापैकी तीन लाख रुपये आगाऊ देण्यात आले. ज्यातून त्याने होंडा सिटी कार खरेदी केली होती आणि राजेंद्रची हत्या करून त्याचा मृतदेह गंगेच्या कालव्यात फेकून दिला होता. आता सोनीपत पोलिसांनी मोहितलाही अटक केली आहे. (Son kills father over family feud in Haryana, Shocking incident at Sonipat)
इतर बातम्या
Suicide | ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…’ इन्स्टावर स्टोरी ठेवत तरुणानं का केली आत्महत्या?
बुंदी सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासा, हत्येनंतरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार