UP Murder : उत्तर प्रदेशात संपत्तीच्या वादातून मुलाकडून पित्याची हत्या, आरोपी फरार
चंद्रशेखरला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो नेहमी आपल्या पत्नीशी भांडण करायचा. यामुळे रामनिवास त्याला संपत्तीतून बेदखल करुन त्याच्या पत्नीच्या नावे संपत्ती करु इच्छित होते. याच संपत्तीच्या कारणातून पिता पुत्रामध्ये वाद झाला. रागाच्या चंद्रशेखरने पित्याला धक्का देऊन खाली ढकलले. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.
उत्तर प्रदेश : संपत्तीच्या वादातून एका मुलाने आपल्या पित्या (Father)ची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये घडली आहे. चंद्रशेखर उर्फ पिंटू (33) असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. तर रामनिवास असे मयत पित्याचे नाव आहे. बापाची हत्या केल्यानंतर आरोपी चंद्रशेखर फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मयत रामनिवास हे पूजा पाठ करुन आपले घर चालवत होते. पित्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Son kills father over property dispute in Uttar Pradesh, accused absconding)
संपत्तीवरुन सुरु होता पिता-पुत्रामध्ये वाद
अतरौली जिल्ह्यातील जखैरा तहसिल गावात रामनिवास आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रामनिवास यांना तीन मुलगे असून चंद्रशेखर हा दोन नंबर होता. चंद्रशेखरला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो नेहमी आपल्या पत्नीशी भांडण करायचा. यामुळे रामनिवास त्याला संपत्तीतून बेदखल करुन त्याच्या पत्नीच्या नावे संपत्ती करु इच्छित होते. याच संपत्तीच्या कारणातून पिता पुत्रामध्ये वाद झाला. रागाच्या चंद्रशेखरने पित्याला धक्का देऊन खाली ढकलले. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध पित्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामनिवास यांचा मोठा मुलगा भजमन नारायण याने कोतवाली पोलिसात आपल्या भावाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करत पुढील तपास सुरु केला. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. (Son kills father over property dispute in Uttar Pradesh, accused absconding)
इतर बातम्या
Jalgaon : वाघूर नदीत 12 वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ