India vs China | भारताने चीनला लायकी दाखवली, दर तासाला अमेरिकेला इतक्या कोटीच्या स्मार्टफोनची निर्यात
India vs China | स्मार्टफोन निर्यातीमध्ये भारताने कमाल केली आहे. फार कमीवेळात भारताने हा साध्य करुन दाखवलं आहे. हा सर्व केंद्र सरकारच्या धोरणांचा परिणाम आहे. चीनची स्मार्टफोनच्या बाजारातील मोनोपोली तोडण्यासाठी भारताने भक्कमपणे पाऊल टाकलं आहे. लवकरच या क्षेत्रात भारताचाही दबदबा होईल.
नवी दिल्ली : स्मार्टफोन मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये चीन आजही मजबूत आहे. पण त्यांची ही मोनोपोली तोडण्यासाठी अमेरिकन कंपन्या चीन सोडून भारतात आल्या. भारतातून उत्पादन सुरु केलं. त्याचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. भारताने काही वर्षातच चीनला त्यांची जागा दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. एका रिपोर्ट्नुसार भारत आता दर तासाला अमेरिकेला 4.43 कोटी रुपयाचे स्मार्टफोन निर्यात करत आहे. विशेष म्हणजे मागच्यावर्षीच्या एक्सपोर्टच्या तुलनेत हा एक्सपोर्ट 253 टक्क्यांनी वाढला आहे. स्मार्टफोन एक्सपोर्ट संबंधीचा हा रिपोर्ट समजून घेऊया.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान भारतातून अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोनची निर्यात वाढली आहे. ही निर्यात वाढून 3.53 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. 2022-23 मध्ये एवढ्याच काळात ही निर्यात 99.8 कोटी अमेरिकी डॉलर होती. व्यापार मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान स्मार्टफोनच्या निर्यातीत भारताचा हिस्सा वाढून 7.76 टक्के झालाय. मागच्या आर्थिक वर्षात याच काळात निर्यात दर 2 टक्के होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, स्मार्टफोन निर्मिती वाढल्याने ही निर्यात वाढली आहे.
आकड्यांमधून समजून घ्या, भारताची कमाल
अमेरिकेला स्मार्टफेोन निर्यातीमध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानावर चीन आणि दुसऱ्या स्थानावर वियतनाम आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोन निर्यातीमध्ये चीन आणि वियतनामचा हिस्सा कमी झालाय.
चीनने अमेरिकेला 35.1 अब्ज डॉलरचे स्मार्टफन निर्यात केले. या आधी मागच्यावर्षी 38.26 अब्ज डॉलरच्या स्मार्टफोनची निर्यात केली होती.
वियतनामकडून अमेरिकेला होणारी निर्यात घटून 5.47 अब्ज डॉलर राहिली आहे.
कमी वेळात भारताने करुन दाखवलं
भारत-अमेरिका स्मार्टफोन निर्यातीला प्रत्येक तासाच्या हिशोबाने समजून घेऊया. पहिल्या 9 महिन्यात भारताने अमेरिकेला दर तासाला 4.43 कोटी रुपयाचे स्मार्टफोन निर्यात केले. याआधी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताने अमेरिकेला प्रत्येक तासाला 94.42 लाख रुपयाचे स्मार्टफोन निर्यात केले होते. म्हणजे भारताने फार कमी वेळात अमेरिकेला स्मार्टफोन एक्सपोर्ट करण्याची क्षमता वाढवली आहे.