Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranya Rao Gold Smuggling Case : टॉयलेटमध्येच अर्धी मोहीम फत्ते व्हायची, रान्या रावच्या सोने तस्करीची एक एक गोष्ट समोर

दक्षिणेतील अभिनेत्री रान्या राव हिला दुबईहून सोने तस्करी करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या तपासात रान्याने सोन्याच्या लडी तिच्या शरीरावर बांधून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला अज्ञात व्यक्तीने फोन करून ही तस्करी करण्यास सांगितले होते.

Ranya Rao Gold Smuggling Case : टॉयलेटमध्येच अर्धी मोहीम फत्ते व्हायची, रान्या रावच्या सोने तस्करीची एक एक गोष्ट समोर
Ranya RaoImage Credit source: tv9 hindi
Follow us
| Updated on: Mar 14, 2025 | 7:22 PM

दक्षिणेतील अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत संचालनालयाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. दुबईच्या वॉशरूममध्ये सोन्याची खेप आपल्या शरीराला बांधली होती. कैचीने एका टेपला कापून एक सोन्याची लड आपल्या शरीराला बांधल्याचं रान्याने सांगितलं. सोन्याच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या रान्या रावने सांगितले की, तिला दोन पॉकेटमध्ये सोने देण्यात आले होते. प्लास्टिक सारख्या पदार्थात हे सोने लपेटलेले होते, अशी माहितीही रान्याने डीआरआयला दिलीय.

कुणी फोन केला?

रान्या रावने डीआरआयला दिलेल्या कबुलीबाबतची माहिती एका न्यूज चॅनलने दिली आहे. या न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, रान्याने 1 मार्च 2025 रोजी एका अज्ञात नंबरवरून तिला आलेल्या फोनचा उल्लेख केला आहे. रान्याने तिला अज्ञात नंबरवरून फोन आला होता असं सांगितलं. पण फोन करणारा कोण होता हे तिलाच माहीत नसल्याचं ती म्हणाली. अफ्रिकी-अमेरिकन टोनमध्ये समोरची व्यक्ती बोलत होती. दुबईच्या एअरपोर्टवर सफेद गाऊनमध्ये भेटेल, असं त्याने सांगितलं होतं. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 3 वर सोने घेऊन जाण्याच्या तिला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आम्ही दुबई एअरपोर्टच्या टर्मिनल 3च्या गेट A वर भेटलो. त्याने मला सोन्याच्या लडी दिल्या आणि निघून गेला. तो सहा फूट उंच होता आणि गोरा होता. त्यानंतर मी त्याला भेटली नाही. तसेच त्याला पाहिलं नाही, असं रान्याने सांगितलंय.

फोन करणाऱ्याने तिला बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोनं पोहोचतं करण्यास सांगितलं होतं. सोन्याचं पॉकेट मिळाल्यानंतर डायनिंग लाउंजजवळच्या वॉशरूममध्ये ती गेली होती. अज्ञात व्यक्तीकडून मिळालेलं पॉकेट उघडल्यानंतर तिला त्यात 12 सोन्याच्या लडी मिळाल्या. त्या चार चारच्या तीन वेगवेगळ्या पॅकमध्ये पॅक करण्यात आलेल्या होत्या.

पायाला सोनं बांधलं

एका पॅकमध्ये सोन्याचे पाच कापलेले तुकडे एकत्र ठेवले जायचे. चिपकणाऱ्या टेपचा उपयोग करून सोन्याची एक एक लड दोन्ही पायांच्या पोटऱ्यांमध्ये चिपकवल्या जायच्या. आणि कमरेच्या चारही बाजूला त्या लावल्या जायच्या. ही टेप विमानतळाजवळच्या दुकानातून खरेदी केली होती, असं तिने सांगितलं. टेपला एका निश्चित आकारात कापण्यासाठी कैचीचा वापर केला होता आणि टेपचे तुकडे आधीच आपल्या बॅगेत ठेवले होते. कारण कैची विमानतळावर घेऊन जाता येत नाही, असं तिने अधिकाऱ्यांना सांगितलं.

यूट्यूबचा आधार घेतला

आपल्या शरीराला बांधलेलं सोनं झाकण्यासाठी रान्याने एअरपोर्टच्या वॉशरूमधील टिश्यू रोलचा वापर केला. तिने काही सोन्याचे तुकडे तिच्या चपलांच्या तळाला आणि बाकी तुकडे जीन्सच्या खिशात ठेवले होते. सोनं कसं लपवायचं, शरीराला कुठे कुठे बांधायचं हे असंख्य यूट्यूब व्हिडीओ पाहून शिकल्याचं तिने सांगितलं.

नवऱ्याच्या क्रेडिट कार्डचा वापर

फ्लाईट बुकिंगच्या बाबतही डीआरआयने तिला विचारलं. त्यावेळी नवरा जतीन विजय कुमार याच्या क्रेडिट कार्डवरून बुकिंग केल्याचं तिने सांगितलं.

इंटरनॅशनल वाऱ्या कशासाठी?

रान्याने तिच्या इंटरनॅशनल दौऱ्याची कारणंही सांगितली आहेत. फोटोग्राफी आणि रिअल इस्टेट बिझनेससाठी आपण परदेशात वारंवार जात असल्याचं तिने म्हटलं आहे. यूरोप, अमेरिका, अफ्रिका आणि मिडल ईस्टमध्ये तिने अनेकवेळा दौरे केले आहेत. सर्वाधिक क्लाइंट दुबईत असल्याने वारंवार तिकडे जावं लागायचं. रान्याने गेल्या वर्षभरात 28 वेळा दुबईची वारी केली. पण ती 15 दिवसातच चारवेळा दुबईला गेल्याने अधिकाऱ्यांचा तिच्यावर संशय बळावला. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली आणि पाचव्यांदा ती पकडली गेली.

चेकींगच होत नसायची

विमानतळावरून निघाल्यावर रान्याची कोणत्याही प्रकारची चेकींग होत नसायची. कारण तिला प्रोटोकॉल मिळालेला होता. प्रोटोकॉलनुसार ती जेव्हाही एअरपोर्टवर यायची ते्हा एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून प्रोटोकॉल पर्सन कॉन्स्टेबल बसवराजू तिला घ्यायला यायचा. त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय ती बाहेर यायची. ती डीजीपी रामचंद्र राव यांची मुलगी असल्यानेच तिला प्रोटोकॉल मिळालेला होता. आता रान्याने कशा प्रकारे प्रोटोकॉलचा दुरुपयोग केला? यात तिच्या वडिलांची भूमिका काय आहे? याची चौकशी होणार आहे.

रान्याचा दबाव

डीव्हिजनल डीसीपीने पोलीस आयुक्तांना या प्रकरणाचा आपला अंतिम अहवाल दिला आहे. या अहवालात मोठा खुलासा करण्यात आला आहे. प्रोटोकॉल मिळावा म्हणून रान्या दबाव टाकायची. आपल्या वडिलांकडे तक्रार करण्याची धमकी द्यायची आणि प्रोटोकॉल मागवून घ्यायची, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या इंटरनल रिपोर्टनुसार, रान्या दुबईतून येताना प्रत्येकवेळी प्रोटोकॉल मागायची. अटक झाली त्या दिवशीही तिने फोन केला होता. त्यावेळी कॉन्स्टेबल बसवराजू यांनी सांगितलं की एक व्हीआयपी येणार आहेत. त्यांच्यासाठी मला ड्युटी करायची आहे. त्यामुळे रान्या नाराज झाली होती. प्रोटोकॉल दिला नाही तर अप्पाजी म्हणजे रामचंद्र राव यांच्याकडे तक्रार करेल, अशी धमकी तिने बसवराजू यांना दिली होती. त्यानंतर बसवराजू यांनी तिला प्रोटोकॉल दिला होता. पण त्याचवेळी डीआरआयने तपासणी करण्यासाठी रान्याला थांबवलं तेव्हा बसवराजू यांनी त्याला हरकत घेतली. ही डीजीपीची मुलगी आहे, तिला रोखू नका, असं बसवराजू म्हणाले होते.

कसा झाला पर्दाफाश?

रान्या राव 3 मार्च रोजी दुबईवरून बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. तिने 15 दिवसात दुबईच्या चार ट्रिप केल्या. त्यामुळे तिच्यावरील संशय बळावला. बंगळुरू एअरपोर्टवर तिच्या मदतीसाठी बसवराजू नावाचा एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात होता. त्याच्याच मदतीने तिने सेक्युरिटी चेकिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. डीआरआयची तिच्यावर नजर होतीच. डीआरआयने तिची चौकशी केली आणि तिला सोन्यासह पकडलं. तपासावेळी तिच्या जॅकेटमध्ये लपवलेले विदेशातील 14.2 किलोग्रॅमचं सोनं सापडलं. त्याची किंमत सुमारे 12.56 कोटी इतकी आहे.

पाचव्यांदाच का पकडली? चौथ्यांदा का नाही?

डीआरआयने पाचव्यांदाच तिला का पकडलं? चारवेळा ती कशी निसटली? असा सवाल केला जात आहे. पण डीआरआयला पाचव्यावेळी स्पेसिफिक टीप मिळाली होती. त्यामुळे ती पाचव्यांदा अडकली. या प्रकरणात रान्याचा नवरा जतिनच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. लग्नानंतर लगेच रान्याचा दुबईत जाणं वाढलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या तरुण राजू नावाच्या एका उद्योगपती सोबत नेहमी बोलायची. आपला मित्र तरुणला भेटायला जात असल्याचं सांगून ती दुबईला जायची. त्यामुळे दोघांमध्ये खटकेही उडाले होते. एवढंच नव्हे तर रान्या वारंवार मित्राला भेटायला दुबईत जात असल्यामुळे संतापलेला जतिन घटस्फोट घ्यायला निघाला होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या सोन्याच्या तस्करीत असल्याचं सर्वात आधी तरुणच्या लक्षात आलं. त्यानंतर एका नेत्याच्या माध्यमातून डीआरआय दिल्लीपर्यंत ही माहिती पोहोचवली गेली.

तरुण राजूही अटकेत

डीआरआयने तरुण राजूलाही अटक केली आहे. तरुण एक पंचतारांकित हॉटेलच्या मालकाचा मुलगा आहे. तरुणनेच रान्याला सोन्याच्या तस्करीत आणल्याचं सांगितलं जात आहे. भारतातून सोनं खरेदी करून दुबईला पैसे पाठवण्यापर्यंत आणि दुबईला सोने पोहोचवण्याचं काम तरुणच करत असतो. प्रोटोकॉलच्या नावाखाली कोणत्याही चौकशीशिवाय रान्या विमानतळावरून येते हे कळल्यानंतर तरुणने तिला आपल्या गँगमध्ये सहभागी करून घेतलं, अशी माहिती समोर आली आहे.

दोन मंत्र्यांना फोन केला, पण फायदा काय?

रान्याला अटक केल्यानंतर तिच्या लॅपटॉप आणि फोनची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात प्रभावशाली लोकांची नावे आढळली. अटकेपासून वाचण्यासाठी रान्याने कर्नाटकातील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना फोनही केला होता. आता भाजपने या दोन्ही मंत्र्यांची नावे न घेता, त्यांचीही या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली आहे. चार महिन्यापूर्वी रान्याचं लग्न झालं तेव्हा मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्यासह कर्नाटकातील अनेक मंत्री या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. अर्थातच डीजीपीच्या निमंत्रणावरूनच सर्व व्हिआयपी लग्नाला आले होते. त्यामुळे रान्याचे काही नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते का याचीही चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी सीबीआयने रान्याच्या घरात तपास केला आहे. तसेच रान्याला लग्नात महागडे गिफ्ट देणाऱ्या व्हिआयपींची एक यादीही सीबीआयने तयार केली आहे.

रान्या राव कोण आहे?

रान्या राव ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचं फिल्मी करिअर फार चाललं नाही. 2014मध्ये माणिक्या या कन्नड सिनेमातून तिने फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. पण सिनेमात फारसं यश नाही आल्याने तिने फिल्मी दुनियेला राम राम ठोकला होता. माणिक्यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीचा रोल केला होता. पण तामिळमधील वाघा सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर 2017मध्ये आलेल्या पटाकी या कन्नड सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीचा रोल केला होता. पण तिच्या तिन्ही सिनेमांना फारसं यश आलं नाही. 2017मध्येच तिचं फिल्मी करिअर संपलं. त्यानंतर तिला काहीच काम मिळत नव्हतं.

वडील डीजीपी रँकचे अधिकारी

रान्या राव ही कर्नाटकाच्या चिकमंगलूर येथील राहणारी आहे. तिला एक बहीण आहे. वडिलाच्या निधानानंतर तिच्या आईने राज्यातील पोलीस हौसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपेमेंट बोर्डाचे अध्यक्ष असलेले डीजीपी रँकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यामुळे रामचंद्र राव हे रान्याचे सावत्र वडील आहेत. रान्याने चार महिन्यापूर्वीच आर्किटेक्ट असलेल्या जतिन हुक्केरीशी विवाह केला होता. त्यानंतर बंगळुरू येथील लेव्हल रोडवर एका खासगी अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. त्यांचं चौथ्या मजल्यावर घर होतं. आणि या घराचं दरमहा भाडं चार लाख रुपये आहे.

दुबईतून सोन्याची तस्करी का?

जाणकारांच्या माहितीनुसार, दुबईतून मिळणाऱ्या सोन्याची प्युऑरिटी अधिक असते. प्रत्येक किलो मागे भारताच्या तुलनेत 25 ते 30 लाखाचं अंतर असतं. दुबईतून आणलेलं सोनं भारतात दागिना बनवताना भेसळ करून दीड पट अधिक होतं. त्यामुळे दुबईतून तस्करी करून आणलेल्या सोन्यात अधिक फायदा होतो.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....