खूशखबर, मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहचला…महाराष्ट्रात येणार या तारखेला

Monsoon hits Kerala: यंदा मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु आहे. त्यानंतर ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.

खूशखबर, मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहचला...महाराष्ट्रात येणार या तारखेला
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 8:25 AM

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील तापमान प्रचंड वाढले आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हापासून सुटका देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दिली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु आहे. त्यानंतर ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. आता महाराष्ट्रात आठवडाभरात मान्सून येणार असल्याची शक्यता आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होत असतो. परंतु यंदा दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच १९ मे रोजी दाखल झाला होता. मान्सूनची वाटचाल अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे. सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला.

महाराष्ट्रात दिलासा मिळणार

मागील वर्षी देशभरातील अनेक भागांत मान्सूनने सरासरी गाठली नव्हती. महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. या पावसाचा परिणाम खरीप व रब्बी हंगामावर झाला होता. आता मे महिन्यातच राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा संपला आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मान्सूनची केरळपर्यंत वाटचाल दमदार झाली आहे. मान्सून वेळे आधीच आल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत 27 जूनपर्यंत मान्सून

अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये सामान्य मान्सून ५ जूनपर्यंत येतो. आता तो लवकर येण्याची शक्यता आहे. रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधून आलेल्या चक्रीवादळ रेमलने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला होता, परिणामी त्याची सुरुवात ईशान्येकडे झाली. स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, 27 जूनपर्यंत दिल्लीत मान्सून होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...