इस्त्रोकडून पुन्हा एक चमत्कार, लडाखमधील लेहमध्ये बनवले अंतराळ, कसे करणार काम?

ISRO Mission: मानवी शरीर लडाखमधील वातावरणात कसे काम करते? यासंदर्भातही इस्त्रो अभ्यास करत आहे. लडाखमधील लोक त्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतात हा अभ्यास अंतराळवीरांना उपयोगी ठरणार आहे. त्यांना अवकाशासारख्या परिस्थितीशी कसे जुळवून घेता येईल हे समजणे यामुळे उपयुक्त होणार आहे.

इस्त्रोकडून पुन्हा एक चमत्कार, लडाखमधील लेहमध्ये बनवले अंतराळ, कसे करणार काम?
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 8:38 AM

ISRO Mission: भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा चमत्कार केला आहे. इस्त्रोने आता पृथ्वीवरच अवकाशासारखी मोहीम सुरू केली आहे. इस्त्रो लवकरच मानवाला चंद्रावर पाठवणार आहे. त्यापूर्वी चंद्रसारखे वातावरण असलेल्या लडाखमधील लेहमध्ये अंतराळ बनवले आहे. लडाखमधील लेह येथून देशातील पहिले ‘ॲनालॉग’ अंतराळ मोहीम सुरु केली आहे. यासाठी निवडलेल्या जागा चंद्रावरील भौतिक परिस्थितीसारखी आहे. लेहमधील हवामान चंद्रासारखे कोरडे आणि थंड आहे. लेहमध्ये मंगळ आणि चंद्रावरील जमीनीप्रमाणे ओसाड जमीन आहे. ग्रहांच्या शोधाच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या वैज्ञानिक मोहिमांसाठी हे एक आदर्श प्रशिक्षण मैदान आहे, असे इस्त्रोने म्हटले आहे.

या संस्थांच्या सहकार्याने उपक्रम

इस्रोने म्हटले आहे की, मानव अंतराळ उड्डान केंद्र, इस्रो, एएकेए स्पेस स्टुडिओ, लडाख विद्यापीठ, आयआयटी बॉम्बे आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या सहकार्याने हे मिशन सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले अंतराळ एक आंतरग्रहीय अधिवास म्हणून काम करणार आहे. जे पृथ्वीवरील बेस स्टेशनच्या आव्हानांना सामोरे जाईल.

हे सुद्धा वाचा

चंद्रा मोहीमेपूर्वीची तयारी

मानवी शरीर लडाखमधील वातावरणात कसे काम करते? यासंदर्भातही इस्त्रो अभ्यास करत आहे. लडाखमधील लोक त्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतात हा अभ्यास अंतराळवीरांना उपयोगी ठरणार आहे. त्यांना अवकाशासारख्या परिस्थितीशी कसे जुळवून घेता येईल हे समजणे यामुळे उपयुक्त होणार आहे. 2025 – मनुष्य चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवर परत येणार आहे. त्यासाठी ही तयारी सुरु आहे.

या गोष्टींनी सुसज्य अंतराळ

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात सुरु झालेले हे मिशन भारताचा चंद्रा मोहिमेसाठी आहे. भारत चंद्रावर मानव पाठवणार आहे. हे मिशन आंतरग्रहीय मोहिमा सुरू करण्यासाठी आधार ठरू शकते. या मिशनमध्ये हॅब-1 नावाच्या कॉम्पॅक्ट आणि फुगवण्यायोग्य निवासस्थानाचा समावेश आहे. हे निवासस्थान हायड्रोपोनिक्स फार्म, स्वयंपाकघर आणि स्वच्छता सुविधांसारख्या आवश्यक गोष्टींनी सुसज्ज आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.